youth was beaten up on suspicion of theft in neemuch, MP Dainik Gomantak
देश

Video: चोरीच्या संशयातून ट्रकमागे बांधून फरपटत नेले; आदिवासी तरुणाचा मृत्यू

Neemuch: मध्य प्रदेशच्या नीमचमध्ये झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांची ओळख पटवली असून, त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

मध्यप्रदेशच्या नीमचमध्ये (Neemuch) घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा माणसांमधल्या हैवानाचे रुप समोर आले आहे. चोरीच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करत पीकअपला बांधून दुरपर्यंत फरपटत नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या तरुणावर निर्दयीपणे केलेल्या मारहाणी आणि त्याला दिलेल्या त्रासामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी पोलिसांनी (MP Police) चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी तरुणांसोबत केलेल्या या कृत्याचा व्हीडिओ देखील बनवला असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांची ओळख पटवली असून त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व लोकांविरोधात खून आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते आहे. ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस स्टेशन परिसरात घडली असून एका आदिवासीला तरुणाला चोर असल्याच्या संशयावरून काही लोकांनी बेदम मारहाण केली. फक्त मारहाण करुनच न थांबता आरोपींनी त्यानंतर तरुणाला दोरीने पिकअपच्या पाय बांधले आणि दुरपर्यंत त्याला फरपटत नेले.

हे सगळं करुन झाल्यावर या लोकांनी पुन्हा एकदा तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर या तरुणाला जखमी अवस्थेत सोडून देत आरोपींनी पोलिसांना कळवले की, त्यांनी एका चोराला पकडले आहे. सिंगोली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी तरुणाला नीमच जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, नीमचचे एसपी सूरज वर्मा यांनी कारवाई करत या संपूर्ण प्रकरणात 8 जणांविरोधात खुनाचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुख्य आरोपी महेंद्रला ताबडतोब अटक करण्यात आली. आरोपी महेंद्र गुर्जरची पत्नी बांदा येथील सरपंच असल्याचे समजते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT