Minister Kailash Vijayvargiya  Dainik Gomantak
देश

Viral Video: 'मला अशा मुली आवडत नाहीत ज्या...', कैलाश विजयवर्गीय पुन्हा बरळले; व्हिडिओ व्हायरल

Minister Kailash Vijayvargiya Statement: भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय महिलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Manish Jadhav

Minister Kailash Vijayvargiya Statement: भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय महिलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, 'मला लहान कपडे घालणाऱ्या मुली आवडत नाहीत.' त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा

पीटीआयच्या वृत्तानुसार, विजयवर्गीय म्हणाले की, 'येथे असे घडते की जर एखादी मुलगी चांगले कपडे घालते, चांगला मेकअप करते आणि चांगले दागिने घालते तर तिला खूप सुंदर मानले जाते. पण परदेशात कमी कपडे घालणाऱ्यांना खूप चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की, ज्याप्रमाणे कमी कपडे घालणारी मुलगी सुंदर असते, त्याचप्रमाणे कमी भाषण देणारा नेता देखील खूप चांगला असतो. परदेशात अशी म्हण आहे. मात्र मी ती इथे पाळत नाही.'

विजयवर्गीय पुढे म्हणाले की, 'माझा असा विश्वास आहे की आपल्या देशात महिलांना देवीचे रुप मानले जाते. त्यांनी चांगले कपडे घालावेत. मला कमी कपडे घालणाऱ्या महिला अजिबात आवडत नाहीत. कधीकधी मुली माझ्यासोबत सेल्फी काढायला येतात तेव्हा मी त्यांना सांगतो, बेटा, पुढच्या वेळी योग्य कपडे घालून ये, मग आपण सेल्फी काढू.'

यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले

कैलाश विजयवर्गीय हे असे वक्तव्य करुन चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही असे वक्तव्य केले आहे. 2022 मध्ये इंदूरमध्ये हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते म्हणाले होते की, 'मी हनुमान जयंतीला खोटे बोलणार नाही. पण आजकाल मुली घाणेरडे कपडे घालतात. आपण महिलांना (Women) देवी मानतो, पण त्या तशा दिसत नाहीत. त्या शूर्पणखासारख्या दिसतात. देवाने तुम्हाला सुंदर शरीर दिले, किमान चांगले कपडे घाला. तुमच्या मुलांना मूल्ये शिकवा.' विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी काँग्रेसने विजयवर्गीय यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली होता. आताही त्यांच्या अशा वक्तव्यावरुन मोठा वादंग माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT