Ravi Shankar Prasad Dainik Gomantak
देश

Video: 'हे मतलबी जय-वीरु नाहीत...', रविशंकर प्रसाद यांनी इंडिया आघाडीवर साधला निशाणा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर जोरदार निशाणा साधला.

Manish Jadhav

Madhya Pradesh Assembly Elections 2023 Ravi Shankar Prasad Press Conference: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक 2023 संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 'मध्य प्रदेशात रस्ते बांधणी, लाडली बहना योजना आणि गरिबांचे कल्याण मोठ्या प्रमाणावर झाले. एवढेच नाही तर मध्य प्रदेश आयटी हब म्हणून विकसित होत आहे. हे एक बिमारु राज्य होते.' येथे प्रामाणिकपणे काम केल्याने या राज्याचा विकास झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, एवढ्यावरच न थांबता प्रसाद पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी काम करत आहे. काँग्रेस गेली अनेक वर्षे सत्तेबाहेर आहे. आज काँग्रेसची अवस्था सर्वांसमोर आली आहे. पूर्वी लालू प्रसादजी कुर्ता फाडून होळी खेळायचे, पण आज राजकारणात कुर्ता फाडण्याचे प्रकार घडत आहेत. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे हे कोणा लहान लोकांनी सांगितले नाही तर मोठ्या लोकांनी सांगितले आहे.'

हे मतलबी लोक जय-वीरु नाहीत

एका प्रश्नाच्या उत्तरात रविशंकर प्रसाद म्हणाले की, 'हे मजबूरी वाले जय-वीरु नाहीत. हे काम करतात ते जय-वीरु आहेत. मात्र विरोधी एकजुटीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.' यानंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत सनातनवर भाष्य केले. सनातनला शिवी दिली गेली, सनातनची तुलना डेंग्यू आणि प्लेग या रोगांशी केली गेली. मात्र, काँग्रेसने यावर दबाव का आणला नाही? असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला.

अयोध्येचा एवढा द्वेष का करता?

रविशंकर प्रसाद यांनी PC दरम्यान सांगितले की, विरोधकांचा रामवर आक्षेप आहे. ते म्हणाले की, राम आमचे आहेत असे आम्ही कधीच म्हटले नाही. राम सर्वांचे आहेत. अयोध्येच्या मुद्द्याचा एवढा द्वेष का करता? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट आदेश दिले. तुम्ही (काँग्रेस) एकदा अयोध्येला भेट देऊन यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT