Madhulika Rawat Dainik Gomantak
देश

जवानांच्या पत्नींना सक्षम करणाऱ्या मधुलिका रावत

सीडीएस बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत AWWA (Army Wives Welfare Association) च्या अध्यक्षा आहेत.

दैनिक गोमन्तक

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांना घेऊन जाणारे आयएएफ हेलिकॉप्टर बुधवारी दुपारच्या सुमारास अप्पर कुन्नूर प्रदेशाजवळ कोसळले. हेलिपॅडपासून सुमारे 10 किमी अंतरावर निलगिरीमध्ये हा अपघात झाला, जिथे ते सीडीएस रावत यांच्यासोबत उतरणार होते, जे आज दुपारी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे कॅडेट संवाद कार्यक्रमात सहभागी होणार होते. IAF Mi-17 V5 हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह CDC बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) देखील होत्या.

कोण आहे मधुलिका रावत?

दिवंगत राजकारणी मृगेंद्र सिंग (Mahendra Singh) यांची मुलगी आणि मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल येथील मूळ रहिवासी, सीडीएस बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत AWWA (Army Wives Welfare Association) च्या अध्यक्षा आहेत. जी भारतातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक असून, जी लष्करी जवानांच्या पत्नी, मुले आणि आश्रित त्यांच्यासाठी काम करते. यापूर्वी, मधुलिका रावत या वीर नारी (सैन्य विधवा) आणि भिन्न अपंग मुलांना मदत करणाऱ्या अनेक कल्याणकारी कार्यक्रम आणि मोहिमांचा एक भाग होत्या. मधुलिका रावत यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. AWWA व्यतिरिक्त, त्या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होऊन, विशेषतः कर्करोगग्रस्तांसाठीही काम करीत होत्या.

लष्करी पत्नींना सशक्त करण्यात त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांना ब्युटीशियन कोर्सेससह टेलरिंग, विणकाम आणि बॅग मेकिंगचे कोर्सेस घेण्यास आणि त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. 'केक्स आणि चॉकलेट्स' बनवण्यासाठी देखील त्या महिलांना प्रोत्साहित करीत होत्या. जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहेत. जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले आणि सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) आहेत. 1 जानेवारी 2020 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पौरी, उत्तराखंड येथे जन्मलेल्या रावत यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून भारतीय सैन्यात सेवा करत आहे. त्यांच्या पत्नी डॉ. मधुलिका रावत यांनी त्यांच्या देशसेवेत सतत सहकार्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT