Lungi Ngidi Dainik Gomantak
देश

AUS vs SA: कांगारुंविरुद्ध लुंगी एन्गिडीचा मोठा धमाका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील चौथा गोलंदाज!

Lungi Ngidi Record: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकून इतिहास रचला. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 84 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

Lungi Ngidi Record: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकून इतिहास रचला. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 84 धावांनी पराभव केला. या विजयाचा नायक ठरला वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी, ज्याने भेदक गोलंदाजी करत 5 गडी बाद केले आणि संघाला विजयापर्यंत पोहोचवले. लुंगी एन्गिडीने या कामगिरीसह एका खास विक्रमाची नोंदही केली, ज्यामुळे तो क्रिकेटच्या इतिहासातील एका खास यादीत सामील झाला.

दरम्यान, मकाय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 49.1 षटकांत सर्व गडी गमावून 277 धावांचे समाधानकारक आव्हान उभे केले. त्यांच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना नियमित अंतराने रोखले. 278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. त्यांच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही आणि त्यांचा डाव 37.4 षटकांत 193 धावांवरच संपुष्टात आला.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्यांच्या गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. परंतु, लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीने सामन्याचे चित्रच पालटले. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही, आणि त्यांचे तगडे फलंदाज बाद करत त्यांची धावगती पूर्णपणे थांबवली.

लुंगी एन्गिडीचा खास विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडत लुंगी एन्गिडीने आपल्या 8.4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 42 धावा देत 5 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने मार्नश लाबुशेन, जोश इंग्लिश, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट आणि ॲडम झम्पा या प्रमुख फलंदाजांना बाद केले.

या दमदार कामगिरीसोबतच त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वेळा 5 बळी घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला गोलंदाज ठरला. हा विक्रम केवळ दक्षिण आफ्रिकेपुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक क्रिकेटमध्येही एक दुर्मिळ मानला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये दोन किंवा त्याहून अधिक वेळा 5 बळी घेणारा लुंगी एन्गिडी आतापर्यंतचा केवळ चौथा गोलंदाज आहे.

या एलिट यादीत लुंगी एन्गिडीसह, वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज कर्टली ॲम्ब्रोस (3 वेळा), न्यूझीलंडचा शेन बांड (3 वेळा) आणि त्यांचाच सहकारी ट्रेंट बोल्ट (2 वेळा) यांचा समावेश आहे. या महान गोलंदाजांच्या पंक्तीत लुंगी एन्गिडीचे नाव जोडले गेल्याने त्याच्या कामगिरीचे महत्त्व अधिक वाढले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध लुंगीची दमदार कामगिरी

लुंगी एन्गिडीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमीच शानदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 11 वनडे सामन्यांमध्ये 16.96 च्या प्रभावी सरासरीने एकूण 26 बळी घेतले, तर त्याचा इकॉनॉमी रेटही 5.03 असा उत्कृष्ट राहिला. त्याची ही कामगिरी सिद्ध करते की, तो ऑस्ट्रेलियासाठी नेहमीच एक धोकादायक गोलंदाज राहिला आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिका आपल्या नावावर केली. आता या मालिकेतील शेवटचा सामना 24 ऑगस्ट रोजी मकायच्या मैदानावरच खेळला जाईल. हा विजय दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

Viral Video: 'प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे चांगला कर्मचारी नव्हे'; Amazon कर्मचाऱ्याच्या Work-Life Balance पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

खरी कुजबुज: म्हापशात भाजपचा 'इन-हाऊस' सामना!

SCROLL FOR NEXT