Court Dainik Gomantak
देश

अल कायदा संघटनेशी कनेक्शन असल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या 11 आरोपींना ‘डिफॉल्ट बेल’

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे 11 आरोपींना जामीन मिळाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे 11 आरोपींना जामीन मिळाल्याची घटना समोर आली आहे. अल-कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि जमात उल मुजाहिदीन (JMB) या दहशतवादी संघटनांशी संबंधित 11 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यांना आता 90 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. लखनऊ उच्च न्यायालयाने आता या आरोपींना डिफॉल्ट जामीन दिला आहे. न्यायमूर्ती ए आर मसूदी आणि न्यायमूर्ती मनीष कुमार निगम यांच्या दुहेरी खंडपीठाने सर्व 11 आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.

90 दिवस आरोपपत्र दाखल झाले नाही

दरम्यान, दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आरोपींना अटक केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही, त्यानंतर कनिष्ठ न्यायालयात सर्व आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, याआधी 13 फेब्रुवारी 2023 रोजी NIA कोर्टाने जामीन फेटाळला होता.

त्यानंतर आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लखनऊ उच्च न्यायालयात अपील केले होते. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने आरोपी लुकमान, अब्दुल तल्हा, मोहम्मद अलीम, नवाजीश अन्सारी यांच्यासह 11 आरोपींना डिफॉल्ट जामीन मंजूर केला.

अटक कधी झाली?

दरम्यान, 27 सप्टेंबर 2022 रोजी एनआयएच्या इनपुटनंतर यूपी एटीएसने सहारनपूर शामली येथून एकूण 11 जणांना अटक केली होती. या 11 जणांवर अल कायदाचे मदतनीस असल्याचा आरोप करुन अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहीजण देशाबाहेरील आहेत, ज्यात बांगलादेशचा रहिवासी असलेला अब्दुल तलहा आणि बांगलादेशच्या जमातुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेला मोहम्मद अलीम यांचा समावेश आहे.

डिफॉल्ट जामीन म्हणजे काय?

डिफॉल्ट जामीन हा जामीन मिळवण्याचा अधिकार आहे. जो एखाद्या आरोपीला मिळतो जेव्हा पोलीस दिलेल्या वेळेत तपास पूर्ण करु शकत नाहीत. त्याला ‘वैधानिक जामीन’ (Statutory Bail) असेही म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT