lt gen manoj pande becomes first engineer to be appointed as army chief Dainik Gomantak
देश

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख, सरकारने नियुक्तीला दाखवला हिरवा कंदील

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती

दैनिक गोमन्तक

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. मनोज पांडे हे देशातील पहिले अभियंता असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख (army chief) मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. (lt gen manoj pande becomes first engineer to be appointed as army chief)

मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर मानले जातात.

39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT