LPG Price Hike Dainik Gomantak
देश

LPG Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

LPG Price Hike News: नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने होत असतानाच, सामान्य जनतेला आणि विशेषतः हॉटेल व्यावसायिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने होत असतानाच, सामान्य जनतेला आणि विशेषतः हॉटेल व्यावसायिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. १ जानेवारी रोजी सकाळीच तेल कंपन्यांनी व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, गेल्या २८ महिन्यांतील ही सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खिशाला कात्री लागली आहे.

व्यावसायिक सिलिंडर १११ रुपयांनी महागला

देशातील प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये प्रति सिलिंडर १११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर चेन्नईमध्ये ही वाढ ११० रुपये इतकी आहे. या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपयांवर पोहोचली असून, चेन्नईमध्ये ती सर्वाधिक म्हणजे १८४९.५० रुपये झाली आहे. ऑक्टोबर २०२३ नंतर पहिल्यांदाच सिलिंडरच्या किमतीत इतकी मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

घरगुती गॅस ग्राहकांना तात्पुरता दिलासा

एकडे व्यावसायिक सिलिंडरचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic LPG) किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडर ८५३ रुपये, तर मुंबईत ८५२.५० रुपयांना मिळत आहे. मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली होती, त्यानंतर आतापर्यंत हे दर स्थिर आहेत.

पीएनजीच्या दरात कपात

सरकारने एकीकडे पाइप नॅचरल कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत काही प्रमाणात कपात करून घरगुती ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बाहेरील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक वापराचा गॅस महागल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या थाळीवर होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

Horoscope: नव्या वर्षाची दमदार सुरुवात! 1 जानेवारीला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठी प्रभाग राखीवता तातडीने जाहीर करा, अन्‍यथा न्यायालयात जाणार; विजय सरदेसाईंचा इशारा

SCROLL FOR NEXT