एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या सततच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. दरमहिना सिलिंडरचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न सध्या LPG ग्राहकांना भेडसावत. सरकार सिलेंडरचे दर कधी करेल याकडे देशातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत स्पष्टीकरण दिलंय.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यास एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याबाबत सरकार विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस 750 डॉलर प्रति मॅट्रिक टन इतका दर सुरू आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर निश्चित होण्यामागे विविध घटक कारणीभूत असतात. आगामी काळात देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, देशात सरकार गरीब जनतेकडून होत असलेल्या मागणीबाबत संवेदनशील आहे. सौदी अरेबियात गॅसच्या दरात 330 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने त्या तुलनेत फार कमी दरवाढ केली असल्याचे त्यांनी म्हटले. सौदी अरेबियात गॅसच्या दरात घट झाल्यास त्याच्या परिणाम देशातील एलपीजी गॅस सिलेंडर दरातही दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.