Crime Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: कोचिंगमध्ये प्रेम, मग मुलीचे दुसरीकडे लग्न; सासरी भेटायला गेलेल्या प्रियकराला...

Madhya Pradesh Crime: मुरैना जिल्ह्यात तलावाच्या काठावर तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुरैना जिल्ह्यात तलावाच्या काठावर तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु करण्यात आला. तपासात जे समोर आले ते जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कुशवाह असे मृताचे नाव आहे. हे प्रकरण मुरैना येथील बनमौर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपचे वडील धनीराम कुशवाह यांनी चार दिवसांपूर्वी मृतक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलीस दिलीपचा शोध घेत होते. काल रात्री 2-3 वाजण्याच्या सुमारास दिलीपचा मृतदेह तलावाच्या काठावर आढळून आला.

मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या. बनमौर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, आरोपींनी (Accused) दिलीपला मारहाण केल्याचे दिसते.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्ती ग्वाल्हेरमध्ये राहून परीक्षेची तयारी करत होता. तिथे कोचिंग सेंटरमधील एका तरुणीसोबत मृतकाचे प्रेमसंबंध होते.

मुलगी दुसऱ्या समाजातील असल्याने मुलीच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. मुलीच्या नातेवाइकांनी तिचे लग्न ग्वाल्हेर येथील दुसऱ्या तरुणाशी लावले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी पोहोचली. तिथे मुलीच्या सासरच्यांनी मृतकाला बेदम मारहाण केली.

या भांडणातच दिलीपचा मृत्यू झाला. बहुधा खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह तलावाच्या काठावर फेकून दिला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT