पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे एकमेव आमदार बायरन बिस्वास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. बायरन बिस्वास हे सागरदिघीचे आमदार होते. पश्चिम मेदिनीपूरमधील घाटल येथे टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बिश्वास यांनी नुकताच तृणमुल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसचे एकमेव आमदार पक्षात सहभागी झाल्यानंतर, टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले की बिस्वास पक्षात सामील झाले कारण त्यांना वाटले की राज्यात फक्त टीएमसीच भाजपशी लढू शकते.
अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले, आज सागरदिघी येथील काँग्रेस आमदार बायरन बिस्वास जोनो संजोग यात्रेत सामील झाले. तृणमूल काँग्रेस परिवारात आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. भाजपच्या फुटीरतावादी आणि भेदभावाच्या राजकारणाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही योग्य व्यासपीठ निवडले आहे. एकत्र, आपण जिंकू!'
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपले खातेही उघडू शकली नव्हती. सागरदिघी मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे सुब्रत साहा विजयी झाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने सागरदिघी जागेवर मार्च २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली.
यामध्ये कॉंग्रेसने बिडी व्यावसायिक बायरन बिस्वास यांना तिकीट दिले. त्यांनी TMC उमेदवार देवाशिष बॅनर्जी यांचा 22,986 मतांनी पराभव केला. अशा स्थितीत विधानसभेत काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
काँग्रेससाठी महत्त्वाची होती कारण, सागरदिघी ही जागा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिरंजन चौधरी यांच्या मतदारसंघात येते आणि बायरन यांनी ज्या देवाशिष यांना पराभूत केले होते, ते देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दूरचे नातेवाईक होते. पण बायरन यांनी निवडणूक जिंकल्यापासून ते टीएमसीमध्ये सामील होतील असे बोलले जात होते आणि अखेर तेच घडले. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आमदारांची संख्या शून्य झाली आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकला दर्शविली होती. ममता म्हणाल्या होत्या की ज्या राज्यांमध्ये ते (काँग्रेस) मजबूत आहेत तेथे टीएमसी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. याशिवाय बंगालसारख्या राज्यात काँग्रेसला टीएमसीला मदत करावी लागेल, असे ममता म्हणाल्या होत्या.
राज्य सचिवालय नबन्ना येथे पत्रकार परिषदेत बोलताना ममता यांनी आपण जादूगार किंवा ज्योतिषी नसल्याचे सांगितले होते. भविष्यात काय होईल हे माहीत नाही पण जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे भाजप लढू शकत नाही हे सांगू शकते. आणि जिथे लोक निराश होतात तिथेही. कर्नाटकातील निकाल हा भाजप सरकारच्या विरोधातला जनादेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.