PM Modi
PM Modi  Dainik Gomantak
देश

PM Modi: ‘’लाहोरला जावून त्यांची ताकद तपासली, लोक हाय अल्लाह म्हणून ओरडत होते’’; अय्यर यांच्या वक्तव्यावर मोदींनी घेतला समाचार

Manish Jadhav

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. कसल्याही परिस्थितीत मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. विशेष म्हणजे, अनेक नेते वादग्रस्त वक्तव्य करुन आपल्या पक्षाला अडचणीतही आणत आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी नेते सॅम पित्रादो यांनी वर्णद्वेषी वक्तव्य करुन राजकीय राळ उडवून दिली होती. याशिवाय, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर देखील यामध्ये मागे नाहीत.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतेच म्हटले होते की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने आपण त्यांचा आदर केला पाहिजे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. INDIA TV या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘’मी स्वतः लाहोरला जाऊन त्यांची ताकद तपासली आहे. तिथे एक रिपोर्टर हाय अल्लाह तौबा, हाय अल्लाह तौबा म्हणून ओरडत होता. पाकिस्तानला (Pakistan) घाबरायचे कशाला? एके काळी हा आपल्याच देशाचा भाग होता.’’

अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 च्या घटनेचा उल्लेख केला, जेव्हा ते अचानक लाहोरला गेले होते. अफगाणिस्तानहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला पोहोचले होते. तिथे त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. 25 डिसेंबर रोजी त्यांची भेट झाली होती, जो नवाझ शरीफ यांचा वाढदिवस आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांच्या आईला भेटवस्तूही दिल्या होत्या. त्यांच्या या अचानक भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती. पंतप्रधान मोदींच्या या अचानक भेटीकडे पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून पाहिले जात होते.

मात्र, पठाणकोट, उरी आणि त्यानंतर पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारु शकले नाहीत. उलट ते अधिकच खराब झाले. विशेष म्हणजे आजच्या मुलाखतीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे लोक पाकिस्तानचा आदर आणि भीती बाळगण्याविषयी बोलतात. आम्ही त्यांना बांगड्या घालायला लावू. पाकिस्तानला घाबरायचे कशाला? 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही अनेकवेळा पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, अमित शाहंसह (Amit Shah) अनेक मंत्र्यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन होताच ‘पीओके’ पुन्हा घेण्याबाबत वक्तव्ये केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT