Counting of votes  Dainik Gomantak
देश

By-polls result : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकींचे निकाल आज होणार जाहीर

सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील रामपूर, आझमगढ आणि पंजाबमधील संगरूर लोकसभेच्या जागांव्यतिरिक्त त्रिपुरातील चार आणि आंध्र प्रदेश, झारखंड आणि दिल्लीतील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 23 जून रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशातील आझमगडमधील अखिलेश यादव आणि रामपूरमधून आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच पंजाबच्या संगरूर मतदारसंघातून खासदार असलेले भगवंत मान यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ही जागा सोडली.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील संगरूरमध्ये पोटनिवडणूक झाली आहे. मान यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संगरूरची जागा जिंकली होती. पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्ष (AAP) विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आप निवडणुकीला सामोरा जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येवरून आप सरकारला विरोधकांचा सामना करावा लागत असताना येथे पोटनिवडणूक होत आहे.

चार राज्यांपैकी त्रिपुरा विधानसभेच्या जागांवर सर्वाधिक पोटनिवडणूक झाली. येथे आगरतळा, जुबराजगर, सुरमा आणि बारदोवाला टाउन विधानसभा जागांचे निकाल येतील. त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या आत्मकूर, झारखंडच्या मंदार आणि दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचाही निकाल लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT