Defense Minister Rajnath Singh Dainik Gomantak
देश

Rajnath Singh: अरुणाचल प्रदेशातून राजनाथ सिंहांचा चीनवर हल्लाबोल; ड्रॅगनचा घेतला चांगलाचं समाचार

Rajnath Singh: भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. चीन सातत्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याबाबत हिमाकत करताना दिसत आहे.

Manish Jadhav

Rajnath Singh: भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. चीन सातत्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याबाबत हिमाकत करताना दिसत आहे. मागील काही दशकांपासून चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सातत्याने सांगत आला आहे. यातच काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यावरुन भारताने चीनवर निशाणा साधला होता. चीनला अशाप्रकारे नावे बदलण्याचा काही एक अधिकार नसल्याचा दावा भारताने केला होता.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (मंगळवारी) अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असताना चीनवर निशणा साधला. अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे चीनने बदलल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी टीकास्त्र डागले. अशाप्रकारची हिमाकत केल्यास शेजारील देशाचा तो भाग आपला भाग होईल का, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. अरुणाचल प्रदेश पूर्व मतदारसंघातील नामसई येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना सिंह म्हणाले की, ईशान्येकडील राज्यातील 30 ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या कृतीमुळे सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.

राजनाथ सिंह म्हणाले की, ''मला चीनला विचारायचे आहे की, जर आपण शेजारील देशातील विविध ठिकाणांची नावे बदलली तर ती ठिकाणे आपल्या भूभागाचा भाग होतील का? अशा कृतींमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडतील. आम्हाला आमच्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण जर कोणी आमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर भारताकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे.''

स्टॅलिन यांच्या सनातनविरोधी वक्तव्यावर राजनाथ यांनी सडकून टीका केली

तत्पूर्वी, सोमवारी एका रॅलीत संरक्षणमंत्र्यांनी DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या कथित सनातन धर्मविरोधी टिप्पणी आणि राहुल गांधींच्या 'शक्ती' टिप्पणीवरुन विरोधी आघाडीवर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षावर टीका करण्यासाठी विरोधक हिंदू धर्म आणि महिलांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. श्रीलंकेला कच्छथीवू बेट देण्यावरुन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या भूतकाळातील अनेक चुकांची देशाला मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT