Delhi Crime  Dainik Gomantak
देश

Delhi Murder Case: गोव्याचा प्लॅन स्वप्नच ठरला, त्याने कारमध्येच गर्लफ्रेन्डचा खून करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या साहिल गहलोत याने त्याची पार्टनर निक्की यादव हिची हत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे.

Pramod Yadav

Nikki Yadav Murder Case : दिल्लीत झालेले श्रद्धा वालकर प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असताना, दिल्लीतून (Delhi) अजून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या 4 दिवस अगोदर ही घटना घडली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या साहिल गहलोत याने त्याची पार्टनर निक्की यादव हिची हत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे.

दोघांनी देखील पळून गोव्याला (Goa Plan) येण्याचा प्लॅन केला होता पण, दोघांत वाद झाला आणि वेगळाच प्रकार घडला.

साहिल गहलोत आणि निक्की यादव एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. साहिल डी फार्मा तर निक्कीने बीए (इंग्रजी ऑनर्स) मध्ये प्रवेश घेतला. यानंतर दोघेही ग्रेटर नोएडामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघेही याच दरम्यान मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, डेहराडूनसह अनेक ठिकाणी फिरायला गेले.

कोरोना लॉकडाऊन दरम्यान दोघेही आपापल्या घरी गेले. मात्र परत आल्यानंतर दोघेही पुन्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

दरम्यान, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. साहिलनेही लग्नास होकार दिला. 9 फेब्रुवारीला साखरपुडा तर 10 फेब्रुवारीला त्याच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली.

निक्कीला याबाबत कळाल्यावर दोघांत भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी लग्नाआधी गोव्याला पळून जाण्याचा प्लॅन केला. दोघांनी मिळून आत्महत्येचा कटही रचला होता. अशी माहिती समोर आली आहे. निक्कीने तर 9 फेब्रुवारीची तिकिटेही बुक केले होते. पण ऐनवेळी साहिलने गोव्याला जाण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले.

निक्की साहिलला सतत दुसऱ्या मुलीशी लग्न करू नकोस तसेच, तिच्यासोबत गोव्याला जाण्यासाठी वारंवार सांगत होती. यानंतर दोघांमध्ये कारमध्ये वाद झाला. दरम्यान, 26 वर्षीय आरोपी साहिल गहलोत याने 22 वर्षीय निक्कीची मोबाईल डेटा केबलने निकीचा गळा आवळून हत्या केली.

साहिलने ढाब्याच्या फ्रीजमध्ये निकीचा मृतदेह लपवून ठेवला. विशेष म्हणजे त्याने 10 डिसेंबर रोजी लग्न देखील केले. साहिलने चार दिवस निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. मात्र व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी साहिलला दिल्लीच्या खैर गावातून अटक केली. साहिल आता तुरुंगात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT