Diwali 2022: दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. याआधीच काही राज्य सरकारांनी फटाके फोडण्याचे नियम ठरवून दिले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत फटाक्यांवर बंदी आहे. खरे तर दिवाळीच्या मुहूर्तावर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि त्यानंतर फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषणाची पातळीही लगेचच वाढते. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर सरकारही कठोर पावले उचलत आहे. श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याची योजना सरकारने आखली आहे.
दिल्ली
दिल्ली (Delhi) सरकारने 1 जानेवारी 2023 पर्यंत राष्ट्रीय राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी घालणारा आदेश पारित केला आहे. राज्य सरकारच्या कठोर आदेशाविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी नकार दिला.
त्यानंतर दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितले की, 'दिल्लीमध्ये दिवाळीत फटाके फोडल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपये दंड होऊ शकतो.' पत्रकार परिषदेला संबोधित करताना राय म्हणाले की, राजधानीत फटाक्यांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड आणि विस्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दिल्ली सरकारने सप्टेंबरमध्ये पुन्हा पुढील वर्षी 1 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घातली होती. अशी बंदी गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे.
पंजाब
24 ऑक्टोबरला दिवाळीत फटाके फोडण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल, असे पंजाब (Punjab) सरकारने बुधवारी स्पष्ट केले. पंजाबमध्ये दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडता येतील. राज्याचे पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री गुरमीत सिंग मीत हरे म्हणाले की, राज्यात फटाक्यांची निर्मिती, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी आहे. ग्रीन फटाक्यांची विक्री परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच केली जाईल.
मंत्री पुढे म्हणाले की, 'दिवाळी व्यतिरिक्त, गुरु नानक देव यांच्या 'प्रकाश पर्व' 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 ते 5 आणि रात्री 9 ते 10 या वेळेत एक तास फटाके फोडण्यास परवानगी असेल. याव्यतिरिक्त, त्यांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री 11.55 ते 12.30 या वेळेत 35-35 मिनिटे देखील परवानगी दिली जाईल. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.'
हरियाणा
हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (HSPCB) सोमवारी ग्रीन फटाके वगळता सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. एका आदेशानुसार, आधीच हरियाणातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
पश्चिम बंगाल
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल सरकारने 24 ऑक्टोबर रोजी काली पूजेदरम्यान फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. ममता सरकारचे मंत्री मानस भुनिया यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही या विषयावर दोन केंद्रीय संस्थांच्या शिफारशींचे पालन करणार आहोत. कोलकाता उच्च न्यायालयाने क्यूआर कोड असलेले ग्रीन फटाके सोडून इतर फटाके राज्यात आयात आणि विकले जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये गेल्या चार वर्षांपासून फटाक्यांवर कडक बंदी आहे. तामिळनाडू सरकारने एक तास फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. तथापि, राज्यात सकाळी 6 ते 7 ते सायंकाळी 7 ते 8 या वेळेत फटाके फोडण्यास परवानगी आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोकांना रुग्णालये, शाळा, न्यायालये इत्यादी ठिकाणी फटाके फोडू नयेत असा सल्ला दिला आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात फटाक्यांवर पूर्ण बंदी नसली तरी नियम कडक आहेत. पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या फटाक्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी असेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दिवाळीसाठी फटाक्यांची दुकाने आणि गोदामे गर्दीच्या ठिकाणांपासून दूर असतील याची खातरजमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी फटाक्यांची खरेदी आणि विक्री केली जाते त्या ठिकाणी अग्निशमनाची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.