High Court Dainik Gomantak
देश

शाळेच्या शेजारीच दारुचे दुकान; पाच वर्षांच्या मुलाने ते बंद करण्यासाठी हायकोर्टात घेतली धाव!

Allahabad High Court: शिक्षणाच्या मंदिराजवळील दारुची दुकाने बंद करुन घेण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Manish Jadhav

Allahabad High Court: शिक्षणाच्या मंदिराजवळील दारुची दुकाने बंद करुन घेण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पाच वर्षांच्या मुलाने शाळेजवळ सुरु असलेल्या दारुच्या दुकानांविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने तात्काळ उत्पादन शुल्क विभागाकडून उत्तरही मागवले. शाळा सुरु झाल्यानंतर नूतनीकरण करण्यात आलेला दारुविक्रीचा परवाना बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद मुलाच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने केला. त्यावर न्यायालयाने शाळा सुरु असताना विभागाने करार परवान्याचे नूतनीकरण का केले, असा सवाल केला. 23 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत पुढील सुनावणी 13 मार्च निश्चित केली होती.

दरम्यान, आझाद नगर येथे राहणाऱ्या पाच वर्षीय अथर्व दीक्षितने त्याचे वडील प्रसून दीक्षित यांच्यामार्फत उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव, उत्पादन शुल्क आयुक्त लखनऊ, डीएम (परवाना प्राधिकरण) कानपूर नगर, उत्पादन शुल्क अधिकारी कानपूर नगर आणि दारु विक्रेते चालक ज्ञानेंद्र कुमार यांना पक्षकार करण्यात आले. अथर्वच्या वतीने वकील आशुतोष शर्मा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अथर्व हा आझाद नगर येथील सेठ एमआर जयपूरिया शाळेत एलकेजीचा विद्यार्थी आहे. ज्ञानेंद्र कुमार यांचे शाळेच्या शेजारीच दारुचे दुकान असल्याची माहिती जनहित याचिकाद्वारे न्यायालयाला देण्यात आली.

कारवाई कशी करावी

दुसरीकडे, अथर्वच्या वडिलांनी पहिल्यांदा यासंबंधी शाळेत तक्रार केली मात्र त्यांनी कारवाई करण्यात अक्षमता दाखवली, असे जनहित याचिकेत म्हटले आहे. यानंतर अथर्वच्या वडिलांनी आयजीआरएसकडे तक्रार दाखल केली. 20 जुलै 2023 रोजी उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने या प्रकरणी अहवाल दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी शाळेपासून 20-30 मीटर अंतरावर दारुचे दुकान असल्याचे मान्य केले. मात्र, हा करार 30 वर्षांपूर्वीचा असून शाळेची स्थापना 2019 मध्ये झाल्याचे सांगितले.

असा सवाल वकिलाने केला

दरम्यान, शाळेची स्थापना नक्कीच 2019 मध्ये झाली असेल, परंतु त्यानंतरचा दारुच्या दुकानाचा करार बेकायदेशीर ठरतो, असे अथर्वच्या वतीने वकील आशुतोष शुक्ला यांनी सांगितले. आर्थिक वर्षानंतरही या परवान्याचे नूतनीकरण कसे झाले? त्यासाठी अथर्वच्या वडिलांनी दाखल केलेल्या आरटीआयला वकिलाच्या वतीने उत्तर दाखल करण्यात आले, ज्यामध्ये 2020-21, 2022-23 आणि 2023-24 मध्ये करार परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या कारणांसाठी जनहित याचिका दाखल केली

शाळेत 475 मुले आहेत, दारुच्या दुकानाजवळ राधाकृष्ण अपार्टमेंट आणि पुष्प शांती अपार्टमेंट देखील आहे. मुलांसह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना मद्यपान करणाऱ्यांचा त्रास होतो.

रोज अथर्व आणि त्याचे मित्र शाळेत जातात तेव्हा दारु पिणाऱ्या लोकांकडून त्यांना शिवीगाळ ऐकू येते. अनेक वेळा दारु पिणारे लोक रस्त्यावर भांडतानाही दिसले आहेत.

शाळेतून परततानाही अशा लोकांचा त्रास सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT