Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Life Threatening Stunt Video: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, ज्यात काही लोक प्रसिद्ध एक्स्प्रेसवेवर जीवघेणे स्टंट करताना दिसतात.

Manish Jadhav

Life Threatening Stunt Video: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, ज्यात काही लोक प्रसिद्ध एक्सप्रेसवेवर जीवघेणे स्टंट करताना दिसतात. अशीच एक घटना गुरुग्राममधून समोर आली, जिथे एका भरधाव महिंद्रा स्कॉर्पिओच्या (Mahindra Scorpio) छतावरुन लोक फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसले, ज्यामुळे इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. 23 सप्टेंबरच्या रात्री अंदाजे 11:25 वाजता, सेक्टर 58 जवळील द्वारका एक्सप्रेसवेवर ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

दरम्यान, @iammayankk नावाच्या 'एक्स' हँडलवरुन हा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये भरधाव स्कॉर्पिओ एक्सप्रेसवेवरुन जात असताना तिच्या छतावरुन जोरदार फटाके फुटताना दिसत आहेत. या स्कॉर्पिओच्या मागोमाग एक हुंडई क्रेटा (Hyundai Creta) गाडी जाताना दिसत आहे. त्या क्रेटाच्या सनरुफमधून (Sunroof) बसलेले लोक या स्टंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत. फुटेजमध्ये फटाक्यांच्या उडणाऱ्या ठिणग्या स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे आजूबाजूच्या इतर वाहनांसाठी मोठा धोका निर्माण झाला.

दुसरीकडे, व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने असा अंदाज व्यक्त केला की, "कदाचित ते लोक आपल्या नव्या स्कॉर्पिओला नंबर मिळाल्याचा आनंद फटाके फोडून साजरा करत असावेत. मात्र त्यांच्या या आनंदाचा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना धोका निर्माण होत असल्याचे स्पष्टपणे दिसते." युजरने रेकॉर्डिंग करणाऱ्या क्रेटा कारच्या नंबर प्लेटचा (DL1CAG3150) फोटो पोस्ट करुन पोलिसांना (Police) माहिती दिली.

गुरुग्राम पोलिसांची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी या स्टंटबाजीवर टीका केली. एका युजरने, "अशा लोकांना केवळ लायसन्स रद्द करणे आणि एफआयआर दाखल करणेच धडा शिकवू शकते," असे मत व्यक्त केले.

या पोस्टवर दिल्ली आणि गुरुग्राम वाहतूक पोलिसांच्या अधिकृत अकाउंट्सना टॅग करण्यात आले होते. यावर गुरुग्राम पोलिसांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली. गुरुग्राम पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये, "आवश्यक कारवाईसाठी हे प्रकरण संबंधित टीमकडे पाठवण्यात आले," असे स्पष्ट केले. तसेच, अतिउत्साहात केलेले असे स्टंट रस्त्यांवर इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आणू शकतात, त्यामुळे पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT