Dhingri Mushroom Dainik Gomantak
देश

Uttarakhand: गड्या आपला गाव बरा! नोकरी सोडून गावाकडे परतले, आता कमवत आहेत लाखोत

Uttrakhand: सुशांत उनियाल आणि प्रकाश उनियाल अशी या भावांची नावे असून पहाडी युवकांसाठी त्यांनी एक उदाहरण कायम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Uttrakhand: खेड्यांकडून शहरांकडे जाण्याचा तरुणाईचा कल वाढत असताना नेहमीच दिसतो. मात्र उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील दोन भाऊ दिल्लीतील नोकरी सोडून गावाकडे परतले आहेत.

महत्वाचे म्हणजे, त्यांनी स्वत:ला उद्योजक म्हणून सिद्ध केले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले असल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत उनियाल आणि प्रकाश उनियाल अशी या भावांची नावे असून पहाडी युवकांसाठी त्यांनी एक उदाहरण कायम केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि सुशांत इतर अनेक पहाडी युवकांसारखे दिल्लीमध्ये नोकरी करत होते. सुशांत हा दिल्लीत सेल्स मॅनेजर होता आणि प्रकाश हा बॅंक मॅनेजर होता. मात्र त्यांनी पहाडांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

2018 मध्ये ते त्यांच्या गावी परतले आणि त्यांनी ओसाड जमिनीत मशरुमचा प्लांट तयार केला. आज हे दोन तरुण कित्येकजणांना रोजगार देत असल्याचे म्हटले जात आहे. 2019 मध्ये मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हिल्स ( एमआयडीच)या केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत त्यांनी 28.65 रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांच्या गावात ढिंगरी जातीच्या या मशरुमची लागवड केली.

लॉकडाऊन मध्ये जेव्हा इतरांच्या नोकऱ्या जात होत्या तेव्हा प्रकाश आणि सुशांत यांनी 10 लाखांचा व्यापार केला. सध्या प्रत्येक महिन्याला 1 हजार किलो ढिंगरी मशरुमचे उत्पादन होते. याबरोबरच स्थानिक बाजरात 150-160 रुपये किलो असे मशरुम विकले जाते. वर्षाला 24 लाख रुपयांचा टर्नओव्हर होत असल्याचे या भावांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी( Narendra Modi ) ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सुशांत आणि प्रकाश यांचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

SCROLL FOR NEXT