Indian Citizens Dainik Gomantak
देश

तात्काळ कीव सोडा, भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनमधील युद्धग्रस्त शहरांमध्ये आणि सीमा भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदीही या संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याच पाश्वभूमीवर भारताने आज आपल्या सर्व नागरिकांना युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) सोडण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना (Indian Citizens) आज तात्काळ कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व भारतीयांनी कोणत्याही किंमतीत आज युक्रेनची राजधानी सोडावी, असे म्हटले आहे. कीवमधून बाहेर पडण्यासाठी ते ट्रेन, बस किंवा कशाचीही मदत घेतात. (Leave Kyiv Immediately Indian Embassy Issues Advisory To Citizens)

दरम्यान, काल दूतावासाने विद्यार्थ्यांना कीवमधील रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितले होते. रेल्वे स्थानकाच्या सल्लागाराने यावेळी सांगितले की, लोकांना पश्चिमेकडील सेक्टरमध्ये नेण्यासाठी युक्रेनने स्पेशल गाड्यांची व्यवस्था केली आहे.

“आम्ही सर्व भारतीय नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना शांत आणि एकजूट राहण्याची मनापासून विनंती करतो. रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नका. त्यातच सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी संयम राखावा. विशेषतः आक्रमक वर्तन दाखवू नका.''

यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पासपोर्ट, पुरेशी रोख रक्कम, आवश्यक सामग्री सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अ‍ॅडव्हायझरीमध्ये, विद्यार्थ्यांना ट्रेनला उशीर किंवा रद्द होण्याची वाट पाहू नये. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परत आणण्यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना हंगेरी, पोलंड, रोमानिया, स्लोव्हाक रिपब्लिकच्या सीमेवर उपस्थित राहण्याचेही निर्देश दिले आहेत.

शिवाय, रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine) यांच्यातील युद्धादरम्यान अजूनही 15 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत आतापर्यंत हजाराहून अधिक विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. त्याचबरोबर उर्वरित लोकांना परत मायदेशात आणण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

SCROLL FOR NEXT