Lakhimpur kheri Issue: Prashant Kishor target Congress Dainik Gomantak
देश

Lakhimpur kheri Issue: प्रशांत किशोर यांचा काँगेसवर निशाणा

लखीमपूर खैरी प्रकरणावरून निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

लखीमपूर खैरी प्रकरणावरून (Lakhimpur kheri Issue) निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'ज्यांना असे वाटते की लखीमपूर घटनेमुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचे एकमत होऊन परतावा होईल, ते एका गैरसमजाखाली आहेत.' प्रशांत किशोर यांच्या मते, दुर्दैवाने, काँग्रेसच्या समस्येवर त्वरित उपाय नाही. कॉंग्रेसचे नाव घेण्याऐवजी पीकेने त्याला जीओपी म्हणजेच ग्रँड ओल्ड पार्टी असे म्हटले आहे.(Lakhimpur kheri Issue: Prashant Kishor target Congress)

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात सामील होतील अशी चर्चा सर्वत्र होती. आणि आता प्रशांत किशोर यांनी केलेले हे विधान सर्वांचं लक्ष वेधणारी आहे. 2014 मध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहून पीके राष्ट्रीय क्षितिजावर चमकले तेव्हापासून त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. प्रशांत किशोर यांना सोबत आणण्यासाठी अनेक राजकीय पक्ष तयार आहेत हेही कोणापासून लपलेले नाही.

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला भाजपसोबत काम केले होते आणि नंतर ते जेडीयूमध्ये सामील झाले आणि पक्षाचे उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेससोबत काम केले होते . त्यांनी पंजाबमध्ये पक्षाला मदत केली आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्लागार होते.याहीवर्षी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी अमरिंदर सिंग यांचे सल्लगार म्हणून पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली होती मात्र थोड्याच दिवसात त्यांनी या गोष्टीला नकार दिला होता.

याशिवाय त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एमके स्टालिन, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत देखील काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT