Russian Tourists Cleaned Kochi Beach Dainik Gomantak
देश

Russian Tourists Cleaned Kochi Beach: कोचीच्या किनाऱ्यावर रशियन पर्यटकांची 'स्वच्छता मोहीम'; व्हिडिओ व्हायरल

Kochi Beach: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

Russian Tourists Cleaned Kochi Beach: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातच, कोची बीचवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही रशियन पर्यटक कथितरित्या कोची बीच साफ करताना दिसत आहेत.

दरम्यान, याबाबत पर्यटन विभागाने अधिकाऱ्यांकडून समुद्रकिनाऱ्याच्या सद्यस्थितीबाबत अहवाल मागवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही रशियन महिला समुद्रात पोहायला जाण्यापूर्वी समुद्रकिनारा साफ करताना दिसत आहेत. या पर्यटकांनी पिशव्यांवर एक मेसेजही लिहिला आहे, ज्यावर त्यांनी लिहिले की, 'तुमचे जीवन स्वच्छ करा, कचरा गोळा करा, पिशवीत टाका, नंतर जाळून टाका किंवा जमिनीखाली गाडून टाका'.

सोशल मीडियावर टीका

याबाबत एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले की, रशियन पर्यटकांनी स्वतः समुद्रकिनारा स्वच्छ करण्यास सुरुवात केली. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, केरळमधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक असलेल्या कोची बीचची स्वच्छता परदेशी लोकांनी करणे अत्यंत चुकीचे आहे.

आता या प्रकरणी कोची हेरिटेज कॉन्झर्व्हेशन सोसायटी समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचे काम प्रभावीपणे करत नसल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत कठोर निर्बंध लादण्याची मागणी होत आहे. रिपोर्ट्सनुसार, कोची बीचवर प्लास्टिक, थर्माकोल आणि काचेच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळतात. त्याचवेळी, सोसायटीचे म्हणणे आहे की, 20 कर्मचारी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेचे काम करत आहेत, परंतु ते पुरेसे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT