Kidnapped niece from Karnataka for grab 50 lakh rupees won at Goa Casino  Dainik Gomantak
देश

गोवा कसिनोमध्ये जिंकलेले 50 लाख रुपये हडण्यासाठी केले भाचीला किडनॅप

27 ऑक्टोबर रोजी मुलगी ट्युशनसाठी जात असताना तिचे करण्यात आले. सुरेशला खंडणीसाठी फोन आल्याने त्याची आई त्याचा शोध घेत होती.

दैनिक गोमन्तक

गोवा कॅसिनोमध्ये (Goa Casino) कर्नाटकातील (Karnataka) एका व्यक्तीने जुगारात 50 लाख रुपये जिंकले. मात्र त्यानंतर गुन्हेगारांनी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या सात वर्षांच्या भाचीचे अपहरण केले. व्यक्तीकडून पैसे उकळण्याच्या लालसेपोटी हा प्रकार करण्यात आला. मात्र, मुलीची सुखरूप सुटका करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीसांनी या प्रकरणात पाच लोकांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बी (नाव बदलले आहे) यांच्या भाचीचे 27 ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले होते. यावेळी सुरेश गोव्याला गेला होता. तेथे त्याने कॅसिनोमध्ये आपले नशीब आजमावले आणि तो 50 लाख रुपये जिंकला. त्याच्यासोबत त्याचा मित्र भिरप्पाही होता. त्यानंतर मित्र भिरप्पाने त्यीच्याकडून कसिनोमध्ये जिंकलेले पैसे उकळण्याची योजना आखली.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. भिरप्पा, प्रफुल्ल, इरणा, विश्वनाथ आणि कृष्ण अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण कॅब चालक म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी या सर्वांनी मुलीचे ट्यूशन क्लासला जात असताना अपहरण केले. सुरेशला खंडणीसाठी फोन आल्याने त्याची आई त्याचा शोध घेत होती. मात्र त्यावेळी तो गोव्यात होता. रात्री दहा वाजता मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कॉल करण्यासाठी अनेक सिमकार्ड वापरत होते. हे सर्व सिमकार्ड स्थानिक डीलरकडून घेण्यात आले होते.

या व्यापाऱ्याची चौकशी केली असता आरोपीची ओळख समोर आली. 29 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणातील चार आरोपींना पकडले होते. तर एका आरोपीला काल 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Goa Live News: सौभाग्यवती महिलांकडून हरतालिका उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT