khalistani terrorist Dainik Gomantak
देश

खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं

नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपाताचा कट असल्याचं स्पष्ट

दैनिक गोमन्तक

शुक्रवारी हरियाणातील कर्नाल येथे चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक करण्यात आले होते. या वेळी पोलीसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त केली होती. या पार्श्वशभूमीवर पोलीसांनी संशियांची कसून चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपाताचा कट असल्याचं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे. (Khalistani terrorist Rinda sent RDX to Nanded )

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे साधारण 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईला याबाबत काहीसा सुगावा लागला होता. त्यानुसार, मुंबईत साखली बॉम्बस्फोट घडवून आणलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमधील लोकांकडून जवळपास 200 कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या रिंदा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT