Kerala West Nile Virus: अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या Flirt व्हेरिएंटची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढू लागली आहे. दरम्यान, केरळमध्ये वेस्ट नाईल व्हायरसची प्रकरणे नोंदवली जात आहेत. केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळ राज्याचा आरोग्य विभागही याबाबत सतर्क झाला आहे. सध्या बाधित रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. केरळच्या आरोग्य विभागाने लोकांना तापाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. वेस्ट नाईलची गंभीर लक्षणे सध्या दिसत नसली तरी तज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, वेस्ट नाईल हा संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो. या विषाणूची लागण झालेल्या 5 पैकी 1 व्यक्तीला ताप आणि इतर लक्षणे दिसतात. वेस्ट नाईलची लागण झाल्यानंतर डोकेदुखी, अंगदुखी सोबत उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये, अंगावर पुरळ येण्याबरोबरच तापही आल्याचे दिसून आले आहे. बहुतेक लोक वेस्ट नाईल विषाणूमुळे तापातून बरे होताना दिसून आले. परंतु थकवा अनेक आठवडे राहू शकतो. कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना आणि वृद्धांना या विषाणूचा धोका सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत, त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.
वेस्ट नाईल विषाणू संक्रमित डासाच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो. या विषाणूचे डास जेव्हा संक्रमित पक्ष्यांना चावतात तेव्हा त्यांना संसर्ग होतो. हा विषाणू पसरण्याचे मुख्य कारण डास आहेत. वेस्ट नाईल हा देखील आरएनए विषाणूचा एक प्रकार आहे. जसे डेंग्यू आणि मलेरियाचे विषाणू आहेत. डेंग्यूप्रमाणेच वेस्ट नाईलही धोकादायक ठरु शकतो. हा विषाणू रुग्णाच्या मेंदूलाही हानी पोहोचवू शकतो.
दरम्यान, वेस्ट नाईल विषाणूमुळे बहुतेक लोकांमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसतात, परंतु अंदाजे 150 पैकी 1 लोक ज्यांना संसर्ग होतो, त्याची लक्षणे देखील गंभीर असू शकतात. हा विषाणू मज्जासंस्थेला हानी पोहोचवतो. त्यामुळे एन्सेफलायटीसची समस्या उद्भवू शकते. जर या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला या समस्या येऊ लागल्या तर त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. जेव्हा विषाणूची लक्षणे तीव्र होतात तेव्हा ताप वाढतो आणि त्यासोबत डोकेदुखी, मान ताठ होणे आणि अर्धांगवायूचा धोका वाढतो. या विषाणूचा कोणत्याही व्यक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.