Kerala Train Fire Dainik Gomantak
देश

Kerala Train Fire: चालत्या ट्रेनमध्ये सहप्रवाशासोबत भयानक कृत्य, आरोपीला रत्नागिरीतून अटक

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने केंद्रीय दक्षता पथकाच्या मदतीने सैफी याला रत्नागिरी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Kerala Train Fire: केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी ट्रेनमध्ये चढण्यावरून दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, या वादानंतर एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले.

या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने केंद्रीय दक्षता पथकाच्या मदतीने सैफी याला रत्नागिरी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे.

केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकाजवळ घातपाताची ही भयंकर घटना घडली होती. अलपूझा-कन्नुर एक्सप्रेसच्या के डी-1 कोचमध्ये रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास शाहरुख सैफी हा इसम घुसला.

ट्रेन कोझिकोड रेल्वे स्थानकाजवळ असताना त्याने गाडीतील सहप्रवाशांवर पेट्रोल टाकले आणि त्याला पेटवून दिले. या घटनेमुळे गाडीत मोठा गोंधळ उडाला होता. आगीमुळे घाबरून गेलेल्या काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. यात एका लहान मुलाचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले होते. केरळ पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी एसआयटी स्थापन केली होती. या घातपाताच्या वेळी संशयित आरोपीही काही प्रमाणात भाजला होता.

तो उपचार घेण्यासाठी रुग्णालयाच्या शोधात होता. पोलिसांना (Police) याचा सुगावा लागताच त्याला अटक करण्यात आली. तो सध्या महाराष्ट्र (Maharashtra) पोलिसांच्या ताब्यात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस व एनआयएचे आभार मानले आहेत.

कोझीकोड येथील जळीत कांडानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक (NIA) घटनास्थळी रवाना झाले होते. या घातपातामागे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण, एनआयएने अधिकृतरित्या यावर कोणतंही भाष्य केले नव्हते किंवा तपास हाती घेतला नव्हता. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी बुलंदशहरमधून एकाला अटक केल्याची चर्चा होती. पण त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT