Kerala High Court Dainik Gomantak
देश

Kerala High Court: याचिकाकर्त्याची सुनावणीला दांडी, याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी HC ने सुनावली अशी सजा; तुम्हीच वाचा

Kerala High Court: सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याचा चांगलाच समाचार घेतला.

Manish Jadhav

Kerala High Court: सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाने दंड ठोठावला.

जर दंडाच्या बदल्यात त्याने 10 झाडे लावली तर त्याची याचिका पुनर्संचयित केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले. EPFO च्या आदेशाविरुद्ध खाजगी रुग्णालय मालकाची याचिका EPF न्यायाधिकरणाने गैरहजर राहिल्यामुळे फेटाळून लावली होती.

तेरा वर्षांनंतर, उच्च न्यायालयाने रुग्णालयाच्या (Hospital) सध्याच्या मालकाने दंडाच्या बदल्यात 10 झाडे लावावीत या अटीवर याचिका पुनर्संचयित केली.

दरम्यान, न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अपीलीय न्यायाधिकरणाचा 2010 चा निकाल बाजूला ठेवला, कारण रुग्णालयाच्या सध्याच्या मालकाने दावा केला की, त्याला पूर्वी न्यायाधिकरणासमोर हजर राहण्याची संधी मिळाली नाही.

तर दुसरीकडे, न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले होते की, 'अपील मान्य केल्यानंतर सुनावणीची तारीख पक्षकारांना सूचित करण्यात आली होती.

मात्र, अपीलकर्त्याच्या वतीने कोणीही हजर झाले नाही. त्यावरुन असे दिसते की, अपीलकर्त्याला याचिकेचा पुढील पाठपुरावा करण्यात रस नाही. त्यामुळे अपील बाय डीफॉल्ट फेटाळले जाते.'

वृक्ष लागवड करण्याचे निर्देश

न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात रुग्णालय मालकाने 2011 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना रुग्णालयाच्या मालकाचा मृत्यू झाला आणि त्याऐवजी त्याच्या पत्नीचा याचिकाकर्ता म्हणून समावेश करण्यात आला होता.

दहा तारखांच्या यादीनंतर, न्यायालयाने 2 जून रोजी न्यायाधिकरणाचा निर्णय बाजूला ठेवला आणि रुग्णालयाच्या मालकाची याचिका पुनर्संचयित केली. यादरम्यान न्यायालयाने म्हटले की, ''येत्या पावसाळ्यात याचिकाकर्त्याने दंड म्हणून 10 झाडे लावावीत.''

न्यायालयाने पुढे म्हटले की, 'अपीलीय न्यायाधिकरण, एर्नाकुलम खंडपीठाला या निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीत कायद्यानुसार याचिकेवर जलदगतीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.'

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध रुग्णालय मालकाने 2007 मध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये न्यायाधिकरणाचा 2010 चा निकाल आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT