Kerala Cm Pinarayi Vijayan Dainik Gomantak
देश

पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करण्यास केरळ सरकारने दिला नकार

दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांनी कपात करुन सर्वसामान्यांना खूशखबर दिली आहे.

दैनिक गोमन्तक

दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांनी कपात करुन सर्वसामान्यांना खूशखबर दिली आहे. गुरुवारपासून हा निर्णय लागू झाला आहे. कर्नाटक (Karnataka), गोवा (Goa), आसाम, मणिपूर आणि त्रिपुरासह अनेक राज्य सरकारांनी (Government of Kerala) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे केरळ सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील कर कमी करण्यास नकार दिला आहे. केरळ सरकारच्या या वृत्तीवर भाजप आणि काँग्रेसने (Congress) जोरदार टीका केली आहे. दोन्ही पक्षांनी राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल (Kerala Finance Minister KN Balagopal) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात किरकोळ कपात केली आहे. आम्ही ते कमी करणार नाही कारण केरळ आधीच मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. केरळ कठीण काळातून जात आहे म्हणून आम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी शकत नाही. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसने राज्य सरकारवर हल्लाबोल करत पी.विजयन सरकार दिवाळीची शुभवार्ता जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष के. सुधाकरन म्हणाले की, मी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करतो परंतु हे पाऊल आधीच उचलायला हवे होते. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशारा आम्ही राज्य सरकारला देतो. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, केरळ सरकार सतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरासाठी केंद्रावर दोषारोप करत असून आता केंद्राने पुढाकार घेतल्याने केरळ सरकारनेही पाऊल उचलले पाहिजे. केरळ सरकारने दर कमी न केल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT