Kedarnath Temple Dainik Gomantak
देश

Kedarnath Temple: केदारनाथच्या गाभाऱ्याला सोन्याची झळाळी; भिंती आणि छताला सोन्याचे थर

आयआयटी रुरकी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च रुरकी आणि एएसआयच्या 6 सदस्यीय टीमनेही कामाची पाहणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध बाबा केदारनाथ मंदिराच्या (Kedarnath Temple) गभाऱ्याला सोन्याची झळाळी देण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती आणि छताला सोन्याचे 550 थर चढवून सजवण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या सुवर्ण सजावटीचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. गभाऱ्याच्या भिंती आणि छतासाठी 19 कारागिरांनी तीन दिवसांत सोन्याचे 550 थर लावून सजावट केली आहे. यानंतर आयआयटी रुरकी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च रुरकी आणि एएसआयच्या 6 सदस्यीय टीमनेही कामाची पाहणी केली.

तज्ञ समितीच्या अहवालानंतर केदारनाथ मंदिराच्या गभाऱ्याला सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम सुरू करण्यात आले. सर्वप्रथम भिंतींमधून चांदी बाहेर काढण्यात आली. तांब्याच्या मदतीने भिंती आणि छताचे मोजमाप घेण्यात आले. मोजमाप घेण्यात आलेले तांबे महाराष्ट्रात नेण्यात आले. महाराष्ट्रात तांब्याच्या मोजमापावर सोन्याचे थर तयार करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी 18 खेचरांच्या मदतीने 550 थरांसाठी लागणारे सोने मंदीरात नेण्यात आले होते.

दोन एएसआय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 19 कारागिरांनी गभाऱ्याला सोन्याचे थर लावण्याचे काम केले. मंदिराच्या गभाऱ्याला, चार खांब आणि शिवलिंगाभोवतीच्या पाण्यामध्येही सोन्याचे हे थर बसवण्यात आले आहेत. बाबा केदारनाथ मंदीर 27 ऑक्टोबर सकाळी 8.30 वा. पासून हिवाळ्यानिमित्त बंद केले जाणार आहे. यानंतर बाबा केदारनाथ यांची पंचमुखी पालखी उखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिराच्या हिवाळी आसनासाठी रवाना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT