K. Kavitha  Dainik Gomantak
देश

Delhi Excise Policy Scam: कविता यांनीच गोव्यात 'आप'ला हवालामार्गे पाठवले 7.10 कोटी; CBI चार्जशीटमध्ये मोठा खुलासा

Delhi Excise Policy Case: कविता यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Manish Jadhav

उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेल्या बीआरएस नेत्या कविता यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने सोमवारी दखल घेतली. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी आरोपपत्राची दखल घेतली आणि या खटल्यात त्यांच्याविरुद्ध पुढे जाण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले. तसेच, कविता यांना पुरवणी आरोपपत्राच्या प्रती पुरवण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी सीबीआयला दिले. कविता यांना यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात आरोप केला की, 'बीआरएस एमएलसी कविता यांनी गोव्यात आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी गैर मार्गाने कमाई केलेली मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात भूमिका बजावली होती.' बोईनपल्ली यांच्या मालकीच्या इंडिया अहेड न्यूज या वाहिनीचे अरविंद कुमार सिंग आणि आरोपी मुथा गौतम यांनी 7.10 कोटी ट्रान्सफर करण्यात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोपही सीबीआयने केला.

सीबीआयच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सोमवारी आरोपपत्राचा अभ्यास करताना सांगितले की, या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध पुढे जाण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. कविता यांना पुरवणी आरोपपत्राच्या प्रती पुरवण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी सीबीआयला दिले.

हवाला ऑपरेटर देवांग सोलंकीचा कबुलीजबाब, त्याच्या फोनमधून मिळालेले कॉल रेकॉर्ड, अरविंद कुमार सिंग याच्या बँक खात्याचे तपशील, व्हॉट्सॲप चॅट्स यांचा वापर करुन सीबीआयने गोव्यातील आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता चनप्रीत सिंह याचा शोध घेतला, असेही सीबीआयने सांगितले.

सीबीआयने पुढे असाही आरोप केला की, "तपासात असे समोर आले आहे की आरोपी चनप्रीत सिंह रैत हा गोव्यातील हवाला चॅनलद्वारे बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशाचा रिसिव्हर होता. त्याने गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षासाठी हे पैसे वाटले होते.”

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सुपुत्री कविता यांच्यावर मद्य व्यावसायिक समूह 'साउथ ग्रुप' आणि आम आदमी पार्टी (आप) नेत्यांसोबत कट रचल्याचा आणि 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने म्हटले आहे की, या पैशातील मोठा भाग आम आदमी पक्षाने 2022 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्च केला होता. के कविता यांचे सहकारी अभिषेक बोईनपल्ली आणि पीए अशोक कौशिक हे हवालाद्वारे गोव्यात पैसे ट्रान्सफर करण्यात गुंतले असल्याचा आरोप केंद्रीय एजन्सीने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT