देश

'काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही' ; गुलाम नबी आझाद यांचे रॅलीदरम्यान वक्तव्य

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद, यांनी रविवारी रॅलीदरम्यान एक वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370, (Article 370) दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही. असे वक्तव्य गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी केले आहे.

बारामुल्ला येथील एका सभेत गुलाम नबी आझाद बोलत होते. आझाद म्हणाले, 'कलम 370 पुनर्संचयित करता येणार नाही. 370 पुनर्स्थापित करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. मी 370 च्या नावाखाली पक्षांना लोकांचे शोषण करू देणार नाही. पण मी लोकांची दिशाभूल करणार नाही. ते परत येऊ शकत नाही.'

स्थानिक पक्षांवर निशाणा साधताना आझाद म्हणाले, 'राजकीय शोषणामुळे काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच लाख मुले अनाथ झाली आहेत. मी खोटेपणा आणि शोषण यावर मते मागणार नाही. मी फक्त तेच बोलेन जे साध्य होईल, निवडणुकीत मला त्रास झाला तरी चालेल.'

येत्या 10 दिवसात आम्ही नवीन पक्षाची घोषणा करू. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांना नोकरी, जमीन सुरक्षा यासाठी मला पाठिंबा द्या, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT