Karnataka CM B. S. Yediyurappa Dainik Gomantak
देश

Karnataka: येडीयुरप्पा मुख्यमंत्री पद सोडणार ? जाणून घ्या

आपल्या राजीनाम्याचं वृत्त हे निराधार असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही, असं येडीयुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकात (Karnataka) राजकिय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (B. S. Yediyurappa) लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. वय आणि वाढते आजारापण यामुळे ते राजीनामा देत असल्याचे प्रथमदर्शनी सागंण्यात येत आहे. मात्र येडीयुरप्पा यांनी हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. आपल्या राजीनाम्याचं वृत्त हे निराधार असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही, असं येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.

येडीयुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेऊन आरोग्याचं कारण पुढे करत राजीनामा तयारी दाखली होती. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचीही भेट घेतली आहे. यावेळी येडीयुरप्पा यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. तेव्हा, लवकरच कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन जे. पी. नड्डा यांनी येडीयुरप्पा यांना दिलं आहे. कर्नाटकमधील भाजपच्या आमदारांची बैठक लवकरात लवकर बोलवण्यात येईल. तोपर्यंत बी. एस. येडीयुरप्पाचं मुख्यमंत्री राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

नवा मुख्यमंत्री कोण ?

मुख्यमंत्री बी. एसय येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण यावर आता राजकिय खलबतं सुरु झाली आहेत. एक ते दोन दिवसामध्ये कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या भाजपमधील जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी करण्यात येत आहे. मोदी सरकारमध्ये प्रल्हाद जोशी कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचबरोबर जोशी कर्नाटकमधून खासदार आहेत. तसेच बी. एल. जोशी यांच्याही नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा केली जात आहे. भाजपचे संघटनमंत्री म्हणून मागील अनेक वर्षापासून संतोष काम करत आहेत. सध्या ते भाजपमध्ये राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. संतोष यांच्याकडे उत्तम प्रशासक म्हणून पाहिले जाते. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि बसवराज एतनाल यांच्याही नावाची चर्चा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT