Yeddyurappa government Dainik Gomantak
देश

Karnataka: बारावीमधील रिपीटर विद्यार्थी होणार पास

रिपीटर विद्यार्थ्यांना बारावीच्या परिक्षेला सामोरे जावे लागणार होते. या विरोधात उच्च न्यायालयामध्ये (High Court) रिपीटर विद्यार्थ्यांनी धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक: राज्यातील कोरोना संकटामुळे (Covid 19) बारीवीची परिक्षा रद्द (XII Exam Canceled) करुन सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय येडीयुरप्पा सरकारने (Yeddyurappa government) घेतला आहे. या निर्णयानुसार रिपीटर विद्यार्थ्यांना बारावीच्या परिक्षेला सामोरे जावे लागणार होते. या विरोधात उच्च न्यायालयामध्ये (High Court) रिपीटर विद्यार्थ्यांनी धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. रिपीटर असलेल्या विद्यार्थ्यांची ही परिक्षा रद्द करुन आपल्यालाही पास करण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयामध्ये करण्यात आली होती. रिपीटर विद्यार्थ्यांना राज्य सरकारने 35 टक्के गुणांसह पास करण्याची माहिती दिली आहे.

कोरोना संकटामुळे मे महिन्यात होणारी बारावीची पुढे ढकलली होती. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसून आल्याने बारावीची परिक्षा रद्द करुन त्यांना दहावी अकरावीच्या आधारे ग्रेड देण्यात यावी अशी सूचना पदवीपूर्व शिक्षण खात्याने केली. मात्र ही सूट फक्त रेग्युलर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिपीटर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परिक्षा द्यावी लागणार होती. त्यामुळे रिपीटर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार होता. मात्र आता रिपीटर विद्यार्थ्यांनाही पास करण्यात आले आहे.

याशिवाय, शिक्षण खात्याच्या निर्णयामुळे यावर्षी बारावीची परिक्षा देणारे 6 लाख 72 हजार विद्यार्थी परिक्षेशिवाय पास झाले आहेत, तर यावर्षी राज्यातील 95 हजार विद्यार्थींनी पुनर्परिक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थीही पास झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT