Pritam Gowda & V. somanna
Pritam Gowda & V. somanna Dainik Gomantak
देश

V. Somanna: तुमचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून मी आमदार!

दैनिक गोमन्तक

बी. एस. येडीयुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागी बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी घेतली. मुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर बोम्मई यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा (H.D. Devegowda) यांची भेट घेतली होती. यावरुन आता पुन्हा एकदा कर्नाटकाच्या राजकारणामध्ये गदारोळाची स्थिती निर्माण झाली असून, काही भाजपच्याच आमदारांनी बोम्मई यांच्या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता भाजपच्या मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळाच्या शपथविधीदरम्यान भेट घेतली होती. त्यानंतर भाजपच्या आमदार प्रितम. जे. गौडा यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

ते पुढे म्हणाले, कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळाच्या शपथविधी आगोद माजी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी का गेले? या भेटीमधून ते पक्ष कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा संदेश देऊ इच्छित आहेत? त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आता अनेक प्रकारचे सवाल उपस्थित करत आहेत. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र दुसरीकडे मंत्री सोमण्णा यांनी उत्तर दिले की, माजी पंतप्रधानांची भेट घेण्यामध्ये कोण्त्याही प्रकारची अडचण नाही. देवेगौडा मागील 50 वर्षांपासून भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आमदार प्रितम गैौडा यांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळीपासून मी आमदार आहे. ते आता आमदार झाल्या म्हणून त्यांना काही देवत्व प्राप्त झाले नाही.

बोम्मई यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. भाजपमधील ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपामध्ये महत्त्वाचे खाते मिळाले नसल्याने अनेक मंत्र्यांनी आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता मात्र बोम्मई यांनी जेडीएसचे नेते आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकातील राजकिय समीकरणांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आठवड्याभरामध्येच मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता. बोम्मई यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले.

दक्षिणेतील भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली होती. येडीयुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची चौथी टर्म होती. मात्र त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामधील दोनच वर्षे पूर्ण केली होती. मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

MLA Disqualification Petition: कामत - लोबोंना दिलासा, पाटकरांना दणका; सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळली

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पुन्हा 7 पंजाबींची हत्या; पाकिस्तानच्या तीन प्रांतात फुटीरतावादाची आग का धगधगतेय?

SCROLL FOR NEXT