umesh katti
umesh katti Dainik Gomantak
देश

Karnataka Minister Demise: कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांच्या निधनावर, मोदींनी व्यक्त केले शोक

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे वनमंत्री यांचे उमेश कट्टी यांचे ह्रदयविकाराने निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्टिट करत उमेश कट्टी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. वनमंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या (Hear Attack) झटक्याने निधन झाले. पीएम मोदी म्हणाले की, उमेश कट्टीजी हे अनुभवी नेते होते ज्यांनी कर्नाटकच्या विकासात मोठे योगदान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्विट केले की, 'उमेश कट्टी जी हे एक दिग्गज नेते होते ज्यांनी कर्नाटकच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय उमेश यांच्या छातीत दुखू लागले आणि ते त्यांच्या डॉलर कॉलनीतील घरी कोसळले, त्यानंतर त्यांना रामय्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी तीव्र शोक व्यक्त केला

बोम्मई यांनी ट्विट केले की, “माझे जवळचे सहकारी श्री उमेश कट्टी, वनमंत्री यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने राज्याने एक कुशल मुत्सद्दी, सक्रिय नेता आणि एक निष्ठावान लोकसेवक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही शोक व्यक्त केला

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, 'अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.'

दरम्यान, रामय्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन सेवांच्या एचओडी डॉ अरुणा रमेश यांनी सांगितले की, त्यांना घरीच 'हृदयविकाराचा झटका आला असावा' आणि संध्याकाळी उशिरा त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT