Karnataka Minister Ramappa Timmapur: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. कर्नाटकातील हसन येथील खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या एका मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य करुन राळ उडवून दिली आहे. प्रज्वल रेवण्णाचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी जोडून त्यांनी मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. रामाप्पा तिम्मापूर असे या मंत्र्याचे नाव आहे. सिद्धरामय्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग आहे.
रामाप्पा तिम्मापूर म्हणाले की, ‘’प्रज्वल रेवन्ना भगवान कृष्णाचा विक्रम मोडू इच्छित होते.’’ रामाप्पा पुढे म्हणाले की, "आम्ही देशात अशी घाणेरडी वृत्ती कधीच पाहिली नाही. कदाचित त्यांना आपण गिनीज रेकॉर्ड बनवू शकतो, असे वाटले असावे. स्त्रिया भगवान कृष्णाप्रती भक्तीभावाने राहत होत्या, पण हे तसे नाही, कदाचित रेवण्णाला त्यांचा रेकॉर्ड मोडू शकतो असे वाटले असेल.’’
दरम्यान, रामाप्पा तिम्मापूर यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. त्यांचे वक्तव्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले जात आहे. यातच, हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दल रामाप्पा यांना मंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी भाजपच्या एका नेत्याने केली.
सोशल मीडिया X वर एका यूजर्सने लिहिले की, "पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की काँग्रेस आणि हिंदू धर्म एकत्र राहू शकत नाही." आणखी एका यूजरने मंत्र्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याने X वर पोस्ट करत म्हटले की "प्रज्वलला कृष्णाचा विक्रम मोडायचा होता" हे कर्नाटकच्या मंत्र्याचे वक्तव्य अत्याचारी, अपमानास्पद आणि भाषण स्वातंत्र्याची अवहेलना करणारे आहे. त्यांना असे वाटते की "कृष्ण देखील त्यांच्यासारखाच एक नश्वर प्राणी आहे?"
हसन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांमध्ये अनेक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, ज्यामध्ये प्रज्वल अनेक महिलांसोबत लैंगिक कृत्य करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ प्रज्वल यांनी स्वत: त्यांच्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड केले होते आणि नंतर त्यांनी त्यांच्या लॅपटॉपमध्ये सुरक्षित ठेवते होते. त्यांचे घर आणि कार्यालयात रेकॉर्डिंग करण्यात आले होते. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एका महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला.
प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. ते कर्नाटकातील हसन येथून विद्यमान खासदार आहेत. यावेळीही ते याच जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री एचडी रेवन्ना यांचा ते पुत्र आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी त्यांचे मामा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, रेवन्ना हसन लोकसभा जागेवन JD(S) च्या तिकिटावर भाजप उमेदवार मंजू ए यांचा 141324 मतांच्या फरकाने पराभव करुन विजयी झाले. ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी 2014 मध्ये बंगळुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली. 27 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांची जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. रेवण्णापूर्वी त्यांचे आजोबा एचडी देवेगौडा 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जागेवरुन विजयी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.