College Dainik Gomantak
देश

Maharashtra-कर्नाटकतील सीमावादाचे पडसाद आता शैक्षणिक संस्थांत, विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी

दैनिक गोमन्तक

Karnataka-Maharashtra Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद अधिकच गडद होत चालला आहे. हा वाद आता शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बेळगाव येथील गोगटे PU कॉलेजमध्ये बुधवारी रात्री घडली.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गोगटे PU कॉलेजमध्ये बुधवारी वार्षिक फेस्ट साजरा करण्यात येत होता, त्यादरम्यान 12वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाचत कर्नाटकचा झेंडा फडकावला, त्यामुळे समर्थकांनी गोंधळ घातला. महाराष्ट्राचे समर्थन करणारे विद्यार्थीही संतप्त झाले. यावरुन दोन विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली आणि हाणामारीपर्यंत मजल गेली.

कॉलेजमध्ये पोलीस

प्रकरणाची संवेदनशीलता पाहून कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले आणि कसेबसे विद्यार्थी शांत झाले. या घटनेनंतर पीयू कॉलेजमध्ये तणावाचे वातावरण असून, त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

घटनेची प्रतिक्रिया

गुरुवारी सकाळी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सदस्यांनी महाविद्यालयासमोर रास्ता रोको करुन, टायर जाळून महाराष्ट्राचा (Maharashtra) निषेध केल्याने या घटनेचे पडसाद उमटले. कर्नाटकातून गोव्याकडे जाणारा रस्ता आंदोलकांनी अनेक तास रोखून धरला होता. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची सीमा वादासंदर्भात भेट घेणार आहेत. याआधी असा तणाव निर्माण होणे हे चांगले लक्षण मानता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT