Supreme Court Dainik Gomantak
देश

Karnataka Hijab Ban: शीख धर्माच्या तुलनेवर SC ने केला 'फाइव्ह के'चा उल्लेख

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.

दैनिक गोमन्तक

Karnataka Hijab Ban: कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मुस्लिम आणि शीख यांच्यात साधर्म्य साधू नका, असे सांगितले. याचबरोबर, शीख धर्माच्या प्रथांची हिजाबशी तुलना करणे योग्य ठरणार नाही, कारण शीखांना पगडी घालण्याची आणि किरपाण बाळगण्याची परवानगी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान शीख धर्माच्या 'फाइव्ह के' चाही उल्लेख केला.

दरम्यान, हिजाबवरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले होते. या याचिकांच्या बॅचवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शीख (Sikh) धर्मातील पाच के-केश, कडा, कच्छा, किरपाण आणि कांगा प्रथेचा उल्लेख केला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने या खटल्यातील याचिकाकर्त्यांपैकी एका वकिलाने शीख धर्म आणि पगडीचे उदाहरण दिल्यावर ही टिप्पणी केली.

शीख धर्मातील प्रथांची तुलना करणे फारसे योग्य नाही

खंडपीठाने म्हटले की, 'शीख धर्मातील अधिकार किंवा प्रथा यांची तुलना करणे फारसे योग्य नाही.' न्यायालयाने यासाठी घटनेच्या कलम 25 चा हवाला देत शिखांना किरपाण बाळगण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. म्हणून या पद्धतींची तुलना करु नका कारण ते 100 वर्षांपूर्वी ओळखले गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या (High Court) 15 मार्चच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्या याचिकांमध्ये म्हटले होते की, हिजाब घालणे हा अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही, ज्याला संविधानाच्या (Constitution) कलम 25 अंतर्गत संरक्षित केले जाऊ शकते.

शीख धर्माच्या प्रथा व्यवस्थित आहेत

याचिकाकर्त्यांपैकी एकाचा युक्तिवाद करताना अधिवक्ता निजाम पाशा म्हणाले की, कलम 25 मध्ये फक्त किरपानाचा उल्लेख आहे, दुसऱ्याचा नाही. त्यावर न्यायालय म्हणाले, 'आम्ही म्हणत आहोत की, शीख धर्माशी साधर्म्य ठेवू नका. इतकंच. आम्ही तेच म्हणतोय.' कारा आणि पगडीबाबत करण्यात येत असलेल्या युक्तिवादावर खंडपीठाने सांगितले की, शीख धर्मातील प्रथा देशाच्या संस्कृतीत चांगल्या प्रकारे प्रस्थापित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT