Karnataka High Court: पती पत्नीला दुभत्या गाईप्रमाणे वागवू शकत नाही, असा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. प्रेमाशिवाय पत्नीकडून पैसे घेणे देखील क्रूरता आहे. क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट नाकारणाऱ्या फॅमिली कोर्टने जून 2020 मध्ये दिलेल्या आदेशाविरुद्ध एका महिलेच्या अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. (karnataka high court said treating wife like cash cow without any emotional attachment to her is cruelty)
दरम्यान, न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, 'पत्नीने पतीच्या असफल व्यवसायावर 60 लाखांपेक्षा अधिकचा खर्च केला असला, तरी तिला चांगली वागणूक दिली जात नाही, त्यामुळे तिला भावनिक आणि मानसिक त्रास होत आहे.'
कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटले?
उच्च न्यायालयाने (High Court) आपल्या निकालात म्हटले आहे की, "पतीने पत्नीला दुभत्या गाईसारखे वागवले आणि तिच्याबद्दल भौतीकवादी वृत्ती बाळगली हे स्पष्ट आहे," असे Bar & Bench.com ची बातमी आहे. तिच्याशी कोणत्याही प्रकारचा भावनिक संबंध नव्हता. त्याच्या या वृत्तीमुळेच तिला मानसिक त्रास आणि भावनिक आघात झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.