Transgender

 

Dainik Gomantak 

देश

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, पोलीस पदांसाठी ट्रान्सजेंडर्सची करणार भरती

राज्य सरकारने कर्नाटक नागरी सेवा (General Recruitment) नियम, 1977 मध्ये बदल करुन ट्रान्सजेंडरसाठी एक टक्के नोकऱ्या राखून ठेवल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक सरकारने (Karnataka Government) राज्य पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत. प्रथमच, ट्रान्सजेंडर राज्य पोलिस भरतीसाठी अर्ज करु शकतील. राज्य सरकारने कर्नाटक नागरी सेवा (General Recruitment) नियम, 1977 मध्ये बदल करुन ट्रान्सजेंडरसाठी एक टक्के नोकऱ्या राखून ठेवल्या आहेत. पोलीस विभागाने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे भरतीसाठी ट्रान्सजेंडर (Transgender) उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची ही पहिलीच घटना आहे.

नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक राज्य राखीव पोलीस (KSRP) साठी विशेष राखीव उपनिरीक्षकाची चार पदे आणि विशेष राखीव उपनिरीक्षक पदाच्या भारतीय राखीव बटालियनमधील एक पद ट्रान्सजेंडरसाठी राखीव असेल. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (Protection of rights) नियम 2020 नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांना जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

अधिसूचना अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी ही भरती काढली आहे. 70 पैकी पाच पदे ट्रान्सजेंडरसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र ट्रान्सजेंडर उमेदवार या पदांसाठी 18 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. याशिवाय, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी सीन ऑफ क्राइम ऑफिसर (SOCO) साठी तीन पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. 15 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT