Ola Uber Ban In Karnataka: कर्नाटक सरकारने अॅपद्वारे सेवा देणाऱ्या ऑनलाईन कॅब (Taxi) कंपन्यांना तीन दिवसात राज्यातील सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात ओला, उबर या कार सेवांसह रॅपिडो या ऑटो सेवेलाही अवैध घोषित केले गेले आहे. आदेशाचे पालन न केल्यास कंपनी आणि वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या कॅब कंपन्या अंतर दोन किलोमीटर असले तरी किमान भाडे शंभर रूपये आकारत असल्याची तक्रार परिवहन विभागाकडे आली होती. ऑनलाईन कॅब कंपन्यांच्या ऑटोरिक्षाचे भाडेही खूप जास्त असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सरकारने कॅब कंपन्यांना नोटीस पाठवून जास्त भाडे आकारणीवरून उत्तर मागवले आहे. अतिरिक्त भाडे वसुलीवरून एकट्या सप्टेंबर महिन्यात 292 गुन्हे नोंद केले आहेत. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ऑटोरिक्षासाठी प्रती दोन किलोमीटरसाठी जास्तीत जास्त 30 रूपये भाडे आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रूपये भाडे आहे.
रिक्षा संघटना आणणार अॅप
दरम्यान, बंगळूर ऑटोरिक्षा युनियनने स्वतःचे अॅप सुरू करण्याची तयारी केली आहे. नम्मा यात्री असे या अॅपचे नाव आहे. 1 नोव्हेंबर रोजी हे अॅप लाँच केले जाणार आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलकेणी यांचा पाठिंबा असलेल्या बेकन फाऊंडेशनसोबत भागीदारीत हे अॅप बनवले गेले आहे.
युनियनने म्हटले आहे की, आमचे प्रवासी घटत चालले आहेत. शिवाय अनेक ग्राहकांना जास्त भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळेच आम्ही अॅप आणण्याचा निर्णय घेतला आहे. नम्मा यात्री अॅपमध्ये भाडे सरकारतर्फे निश्चित्त केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.