RT-PCR test Dainik Gomantak
देश

गोव्यासह देशातील 'या' राज्यांत जाण्यासाठी द्यावी लागेल RT-PCR टेस्ट

ज्या लोकांनी लसीचा एक डोस घेतला असेल ते राजस्थान आणि नागालँडमध्ये प्रवेश करू शकतात.

दैनिक गोमन्तक

ऑगस्ट महिना सण आणि उत्सवांनी भरलेला महिना आहे, या महिन्यात गणेश चतुर्थी, रक्षाबंधन, नागपंचमी श्रावण मास अशा पध्दतीचे कितीतरी पारंपरिक सणांची रेलचेल असते. मात्र कोरोना (Covid-19) या सगळ्या सणांवर (Festival) पाणीच फेरले आहे. अजूनही देशातून कोरोनाचं संकट गेलेले नाही. अनेक राज्यात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) संभाव्यता टाळण्यासाठी निर्बंध आणि प्रतिबंध कडक करण्यात आले आहेत. म्हणूनच, एखाद्या राज्यात प्रवेश करताना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र गरजेचे असते. (From Karnataka to Goa complete, list of states that require negative RT-PCR reports or vaccination certificate)

या राज्यात प्रवेश करतांना RT-PCR किंवा लसीचे प्रमाणपंत्र आवश्यक आहेत

  • छत्तीसगड: मंगळवारी, छत्तीसगड सरकारने जाहीर केले की, जे लोक हवाई मार्गाने राज्यात येत आहेत, त्यांना बोर्डिंग करताना कोविड -19 चाचणीचा (96 तासांपेक्षा जुना नाही) नकारात्मक RT-PCR अहवाल दाखवावा लागेल.

  • कर्नाटक: कर्नाटक सरकारच्या मते, केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेश करण्यासाठी नकारात्मक RT-PCR अहवाल (72 तासांपेक्षा जुना नाही) दाखवावा लागेल.

  • चेन्नई: चेन्नई प्रशासनाने 5 ऑगस्टपासून केरळ आणि तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR नकारात्मक चाचणी अहवाल (72 तासांपेक्षा जुना नाही) सादर करणे अनिवार्य केले आहे

  • हिमाचल प्रदेश: राज्यात कोविड -19 ची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता. बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR नकारात्मक चाचणी अहवाल (72 तासांपेक्षा जुना नाही) सादर करणे अनिवार्य केले आहे. मात्र ज्या पर्यटकांनी लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस मिळाला आहे आणि प्रमाणपत्र आहे ते सहजपणे राज्यात प्रवेश करू शकतात.

  • गोवा: केरळमधून प्रवास करणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेश करण्यासाठी नकारात्मक RT-PCR अहवाल दाखवावा लागेल.

  • पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल सरकारने जारी केलेल्या सुधारित प्रवास मार्गदर्शक सुचनांनुसार, पुणे, मुंबई आणि चेन्नई येथून प्रवास करणाऱ्या लोकांना विमानात चढताना त्यांचे नकारात्मक RT-PCR (72 तासांपेक्षा जुना नाही) दाखवावे लागेल. हा नियम 8 ऑगस्टपासून करण्यात लागू आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा यासारख्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करतांना RT-PCR चाचणी अहवाल आवश्यकता नसणार. दुसरीकडे, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि मेघालयात प्रवेश करण्यासाठी यापुढे नकारात्मक RT-PCRची आवश्यकता असेल. ज्या लोकांनी लसीचा एक डोस घेतला असेल ते राजस्थान आणि नागालँडमध्ये प्रवेश करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT