Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात 'हे' मुद्दे ठरले गेमचेंजर, भाजपच्या सत्तेला मोठा सुरुंग; काँग्रेसचा बहुमतासह दणदणीत विजय

Karnataka Election 2023: काँग्रेसच्या उदयानंतर कोणत्या मुद्दयांनी चमत्कार घडवला आणि कोणते मुद्दे फसले याची चर्चा सुरु झाली आहे.

Manish Jadhav

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 224 जागांसाठी मतमोजणी सुरु असून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने बहुमताचा टप्पा ओलांडला.

काँग्रेसच्या उदयानंतर कोणत्या मुद्दयांनी चमत्कार घडवला आणि कोणते मुद्दे फसले याची चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कर्नाटकात कोणत्या मुद्यांनी करिष्मा घडवला आणि कोणते मुद्दे फेल ठरले?

10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये तब्बल 73.19 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

कर्नाटक निवडणूकीत या मुद्द्यांनी करिष्मा केला

भ्रष्टाचाराचा मुद्दा- कर्नाटकातील (Karnataka) भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला होता आणि सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरले होते. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने कर्नाटकातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करुन सातत्याने निशाणा साधला होता.

पंतप्रधानांवर थेट हल्ला- काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता. आणि याचाच फायदा काँग्रेस पक्षाला मिळाला. काँग्रेसने कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळवले.

अमूल विरुद्ध नंदिनी- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अमूल विरुद्ध नंदिनी हा मुद्दा गाजला. या वर्षी 5 एप्रिल रोजी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने कर्नाटकमध्ये अमूल उत्पादने लॉन्च करण्याची घोषणा केली.

या घोषणेनंतर राज्यात हा मुद्दा गाजला आणि कर्नाटकातील अनेक नेते आणि लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली होती.

40 टक्के कमिशनचा मुद्दा - कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने 40 टक्के कमिशन वाले सरकारचा सर्वात मोठा नारा दिला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोस्टर्स आणि रॅलींमध्ये या मुद्द्याचा भरपूर उल्लेख होता.

बेळगाव येथील एका कंत्राटदाराने भाजपच्या एका मंत्र्यावर 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती.

यानंतर, अनेक कंत्राटदार पुढे आले असून कंत्राटदार संघटनेने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

कर्नाटक निवडणुकीत हे मुद्द फसले

बजरंगबली मुद्दा - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने बजरंगबलीचा मुद्दा उचलून धरला आणि त्यातून निवडणूक जिंकायची होती.

खरे तर, काँग्रेसने (Congress) आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची चर्चा केली होती, त्यानंतर भाजपने त्याचा संबंध बजरंगबलीशी जोडला.

हिजाब वाद- कर्नाटक निवडणुकीदरम्यान भाजपने हिजाबचा वाद वाढवला. 31 डिसेंबर 2021 रोजी उडुपीच्या सरकारी महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या 6 विद्यार्थिनींना वर्गात येण्यापासून रोखले होते.

त्यानंतर आंदोलन सुरु झाले. हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर आपला निर्णय दिला आणि धार्मिक दृष्टिकोनातून हिजाब अनिवार्य नसल्याचे सांगितले.

टिपू सुलतानचा मुद्दा - कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टिपू सुलतानच्या मुद्द्याचेही जोरदार पडसाद उमटले, पण त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT