Karnataka Election Result 2023: Dainik Gomantak
देश

Karnataka Election Result 2023: 'आय अ‍ॅम अनस्टॉपेबल'... म्हणत काँग्रेसने शेअर केला राहुल गांधींचा व्हिडिओ

कर्नाटकात मतमोजणी सुरू झाली असून काँग्रेसला आघाडीवर दिसत आहे.

Puja Bonkile

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाली ८ वाजता सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत दिसत आहेत. 

'आय अ‍ॅम इनव्हिझीबल, आय अ‍ॅम कॉन्फिडंट, आय अ‍ॅम अनस्टॉपेबल टु डे', या ट्विटवर असे कॅप्शन देण्यात आले आहे. मतमोजणीमध्ये काँग्रेसला १३१ तर भाजपला ७३ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक पार पडली आहे. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडं देणार हे आज ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT