Congress MLA Jamir Ahmed Khan Twitter/ANI
देश

VIDEO: काँग्रेस MLA ने खाल्ले दलित संताचे उष्ठे अन्न, कट्टरतावाद्यांना चोख प्रत्युत्तर

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते दलित समाजातील संत नारायण यांच्या तोंडातून अन्नाचा घास काढून खाताना दिसत आहेत. खरं तर, एका कार्यक्रमादरम्यान, बेंगळुरुमधील काँग्रेस आमदार जमीर खान यांनी समजात तेढ निर्माण करणाऱ्या कट्टरपंथींयाना लक्ष्य करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले. (Karnataka Congress Mla Feeds Dalit Swamiji Eats Same Chewed Food)

दरम्यान, त्यांनी जवळच ठेवलेल्या ताटातील अन्न स्वतःच्या हाताने दलित स्वामींना खाऊ घातले. त्याचवेळी स्वामींनी त्यांना ताटातून अन्न भरवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी नकार दिला आणि तोंडातून अन्न काढून वाटून घ्या असे सांगितले. त्यानंतर स्वामीजींनी तोंडातून अन्न काढून त्यांना खाऊ घातले. हे सर्व पाहून तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून जमीर अहमदचे कौतुक केले.

वास्तविक, आंबेडकर जयंती-ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन चामराजपेठेत करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, जमीर खान यांनी समुदायांमधील तेढ कमी करण्याबद्दल आणि कट्टरपंथी घटकांना लक्ष्य करण्याबद्दल बोलले. त्याचवेळी सोशल मीडियावर (Social Media) काही लोक या व्हिडिओची खिल्ली उडवत आहेत. तर अनेकजण याला बंधुभावाचे उदाहरण म्हणत आमदाराचे (MLA) कौतुक करत आहेत.

याशिवाय, चार वेळा आमदार असणारे जमीर अहमद खान (Congress MLA Jamir Ahmed Khan) यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT