Karnataka Assembly Elections 2023 Results | Congress and JDS Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Elections 2023 Results: काँग्रेस अन् जेडीएस संपूर्ण चित्र बदलणार का? कोण मारणार बाजी? वाचा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये चित्र सतत बदलत आहे.

दैनिक गोमन्तक

Karnataka Assembly Elections 2023 Results: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये चित्र सतत बदलत आहे. दरम्यान, आता भाजप नेते सदानंद गौडा यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, कोणताही अंतिम निर्णय देणे खूप घाईचे आहे. तीन ते चार फेऱ्यांनंतर चित्र स्पष्ट होईल. आमच्या विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर चुरशीची लढत आहे.

एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष बहुमताचा आकडा पार करणार नाही. जेडीएसने शुक्रवारी (10 मे) मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मतदानोत्तर युतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. जेडीएस यावेळी कर्नाटकात किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडमध्ये कोण पुढे आणि कोण मागे?

निवडणूक निकालाच्या ताज्या ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप यामध्ये मागे आहे. सध्या भाजप 83 जागांवर, काँग्रेस 106 जागांवर, जेडीएस 29 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी 2 जागा इतरांच्या खात्यात जाताना दिसत आहेत. या निवडणुकीत जेडीएसची नेमकी काय भूमिका असणार याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT