Kargil Vijay Diwas Dainik Gomantak
देश

Kargil Vijay Diwas: 5 रुपयाचा डॅालर ठरला सुभेदार योगेंद्र यादवांसाठी जिवनदान

आजच्या दिवशी 22 वर्षापूर्वी भारताने कारगिल युद्ध (Kargil War) जिंकून पाकिस्तानला (Pakistan) पाणी पाजलं होते.

दैनिक गोमन्तक

आजच्या दिवशी 22 वर्षापूर्वी भारताने कारगिल युद्ध (Kargil War) जिंकून पाकिस्तानला (Pakistan) पाणी पाजलं होते. भारतीय जवानांनी कारगिल मध्ये मिळवलेल्या विजयाला (Kargil Vijay Diwas) आज तब्बल 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षी 26 जुलैला भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाला सलाम म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 मध्ये देशाच्या बहादूर जवानांनी कारगिल युद्धात पाकिस्तानला नामोहरम केले. या शूर वीरांमधील एक महत्वाचं नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव (Yogendra Yadav). पाकिस्तानी रेंजर्स आणि यादव यांच्यात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. यादव यांच्या शरीरामध्ये तब्बल 15 गोळ्या लागल्या होत्या.

तसं असतानाही ते लढत राहिले. योगेंद्र यादव यांनी पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना ठार केले. योगेंद्र यादव यांनी जखमी असतानाही दाखवलेले शौर्य आणि त्यांनी मिळालेल्या माहितीमुळे भारतीय जवानांना टायगर हिलवर तिरंगा फडकवणे सोपे गेले होते. सुभेदार योगेंद्र यादव यांना या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले.सुभेदार योगेंद्र यादव हे हयात असताना देखील परमवीर चक्र मिळवणारे मोजक्या जवानांपैकी एक आहेत.

18 ग्रेनेडियर्समध्ये भारतीय सैन्यात असलेल्या योगेंद्र यादव यांना आपल्याला युध्दासाठी जावे लागणार याची कोण्त्याही प्रकारची कगल्पना नव्हती. कल्पनाही नव्हती. दरम्यान, त्यांच्याकडे टायगर हिल शिखरावर तिरंगा फडकवण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. खडा कडा पार करत टायगर हिलच्या दिशेने 21 जवानांनी आणि योगेंद्र यादव यांनी कूच केले. दरम्यान पाकिस्तानी सैन्याने एक बंकरही उद्ध्वस्त केले होते. परंतु पुढे आगेकूच करेपर्यंत यादव यांच्यासमवेत अवघे सातच सहकारी शिल्लक राहिले होते. यादव आणि त्यांच्या सहकारी जवानांनी आपल्या जवानांचा शोध घेण्यासाठी आलेल्या 10-12 पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले होते.

पण त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुर्देवाने योगेंद्र यादव यांचे सगळे सहकारी शहीद झाले होते. वीरमरण आलेल्या भारतीत सैन्यांच्या शरीरावर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळया झाडणे चालू ठेवले होते. यादव हे सगळं असहायपणे पाहत होते. योगेंद्र यादव गंभीर जखमी झालेले असतानाही ते शांत पडून राहिले होते. यादव यांच्यावर देखील गोळ्या झाडल्या गेल्या मात्र ते वेदना सहन करत त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर एका पाकिस्तानी सैनिकाने योगेंद्र यादव यांच्या छातीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली.पण योगेंद्र यादव यांच्या खिशात असलेल्या पाच-पाच रुपयांची नाणी ठेवलेल्या पाकिटामुळे ते बचावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT