Kapil Sibal Dainik Gomantak
देश

कपिल सिब्बलांनी कॉंग्रेस सोडताच पूर्व कॉंग्रेस नेत्याने साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी बुधवारी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

दैनिक गोमन्तक

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'मी 16 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.' सिब्बल यांनी काँग्रेस सोडल्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांकडून हल्ले आणखी तीव्र झाले आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या जितिन प्रसाद यांनी त्यांचे जुने ट्विट रिट्विट करताना सिब्बल यांना टोला लगावला आहे.

विशेष म्हणजे, जितिन प्रसादांनी काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर सिब्बल यांनी ट्विट केले होते की, 'जितिन प्रसादांना भाजपकडून (BJP) ‘प्रसाद’ मिळणार का? त्यांना केवळ निवडणुकीसाठीच वेठीस धरण्यात आले आहे.'

दुसरीकडे, नामांकनानंतर बुधवारी सिब्बल म्हणाले की, 'मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही. मी 16 रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे आभार मानतो. 2024 च्या निवडणुकीसाठी आपण सर्व एकत्र येत आहोत. केंद्र सरकारच्या त्रुटींवर प्रकाश टाकणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT