Kanjhawala case Dainik Gomantak
देश

Kanjhawala case: कंझावाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा

Kanjhawala case: हत्येचा आरोप लागेल या भीतीने त्यांनी गाडी न थांबवता गाडी चालूच ठेवली.

दैनिक गोमन्तक

Kanjhawala case: कंझावाला प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत.याआधी, मृत अंजलीची मैत्रीण निधीचा याप्रकरणाबरोबर संबंध लावला जात होता. त्याचबरोबर, 2020 ला निधीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले असल्याचेसमोर आले होते. आता आणखी एक नवीन माहीती समोर आली आहे.

आरोपींनी पोलीसांना अंजली गाडीमध्ये अडकल्याचे माहीत नसल्याचे सांगितले होते. आता अटक असलेल्या आरोपींनी पोलीसांसमोर हे मान्य केले आहे की, त्यांना अंजली गाडीत अडकल्याचे त्यांना माहीत होते . मात्र, हत्येचा आरोप लागेल या भीतीने त्यांनी गाडी न थांबवता गाडी चालूच ठेवली. ती गाडीतून बाहेर निघण्याची वाट बघत गाडी फिरवत राहिल्याचे कबुली दिली आहे. त्याचबरोबर, गाडीत मोठ्याने गाणी चालू नसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. याप्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सहा जण पोलीसांच्या अटकेत आहेत तर एकाला जामीन मिळाला आहे.

दरम्यान , 31 डिसेंबरला अंजली आणि निधी गाडीवरुन जात असताना समोरुन वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या स्कूटीला धडक दिली .या अपघातात( Accident) निधी वाचली मात्र अंजली कारमध्ये अडकली होती. तरुणांनी गाडी न थांबवता ती तशीच सुरु ठेवली 12 किलोमीटर अंजलीला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली(Delhi) पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट लवकरात लवकर सादर करण्याचा आदेश दिला आहे. दिल्ली पोलिस( Police)च्या वरिष्ठ अधिकारी आईपीएस शालिनी सिंह याना व्यापक रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT