NABARD Assistant Manager Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

NABARD Recruitment 2021: असिस्टेंट मॅनेजर पदांसाठी असा करा अर्ज

नाबार्डने (National Bank for Agriculture and Rural Development, NABARD) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

NABARD Assistant Manager Recruitment 2021: नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँकेने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 162 पदांची भरती होणार आहे. अशा परिस्थितीत ज्यांना बँकेत काम करायचे आहे ते नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट, nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात. (Jobs in NABARD: Here's how to apply)

नाबार्डने (National Bank for Agriculture and Rural Development, NABARD) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे. यात (NABARD Assistant Manager Recruitment 2021) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 7 ऑगस्ट 2021 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी nabard.org या वेबसाइटवर जावून आपण सविस्तर माहिती मिळवू शकता.

या रिक्त जागा (NABARD Assistant Manager Recruitment 2021) अंतर्गत एकूण 162 पदे भरती केली जाणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर जनरलसाठी 148, राजभाषा सेवेसाठी 5 जागा, प्रोटोकॉल व सुरक्षा सेवेसाठी 2 जागा निश्चित केल्या गेल्या आहेत. याशिवाय 7 पदांवर महाव्यवस्थापकांची भरती केली जाणार आहे. रिक्त पदांसाठीच्या संपूर्ण तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेचे वाचन करणे गरजेचे आहे.

पात्रता

सहाय्यक व्यवस्थापक जनरल- या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली असली पाहिजे. पदवीधर उमेदवाराला किमान 50% गुण असणे गरजेचं आहे.

राजभाषा सेवा - यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार पदवीधर असणे आवश्यक आहे, पदवीधर उमेदवाराला किमान 50% गुणांसह इंग्रजी आणि हिंदी विषयाचे ज्ञान असणे अनिवार्य ठेवले आहे. प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा- यामध्ये उमेदवारांना आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये 5 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे.

महाव्यवस्थापक - या रिक्त जागेत महाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली असली पाहिजे. पदवीधर उमेदवाराला किमान 60% गुण असणे गरजेचं आहे. त्याच विषयात मास्टर पदवीमध्ये 55% गुण मिळविणे अनिवार्य आहे.

अर्ज फी

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या या रिक्त पदांसाठी फी जमा केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये आणि एससी एसटी आणि पीएच वर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज फी निश्चित करण्यात आली आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन मोडमध्ये ही फी भरती येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT